या मुलानं काढली आहे भाडोत्री बॉयफ्रेंड योजना...पोरींनो, सिंगल राहण्याचे दिवस गेले !!

आमच्या इथे बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड भाड्याने मिळेल अशी पाटी जर तुम्हाला दिसली तर आश्चर्य मानू नका, कारण सोशल मिडीयाच्या जगात काहीही विकलं जाऊ शकतं.

आज ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या दिवशी आमचे अनेक बंधू सिंगल असतील. सिंगल असणे ही काही फक्त मुलांची मक्तेदारी नाही राव. मुली देखील सिंगल असतातच. याच सिंगल मुलींचा कळवळा येऊन शकुल  गुप्ता या गुडगावच्या मुलाने चक्क स्वतःला भाड्याने द्यायचं ठरवलं आहे. म्हणजे एकदिवशीय भाडोत्री बॉयफ्रेंड.  

शकुल २६ वर्षांचा असून त्याने नुकतंच त्याच्या फेसबुकवरून स्वतःला भाड्याने बॉयफ्रेंड म्हणून देण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्याच्या जाहिरातीवरून तो बॉयफ्रेंड म्हणून काय करू शकतो हे त्याने दिलं आहे. त्याने या संदर्भात काही पॅकेजेस ऑप्शन म्हणून दिले आहेत. पॅकेज निवडल्यानंतर मुलींना तशी सर्व्हिस मिळेल. जसे की पॅकेज नंबर १ घेतल्यास हात धरण्याची आणि खांद्याभोवती हात ठेवण्याची सर्व्हिस मिळेल. पॅकेज नंबर २ घेतल्यास या सर्वांसोबत चुंबन फ्री देण्यात येईल, अश्याच प्रकारे एकूण ४ पॅकेज आहेत.

या सोबत शकुलने आणखी एक धमाकेदार ऑफर दिली आहे. मुलींनो, तुम्ही जर ‘RICHGUY’ हा कोड वापरला तर तुम्हाला २० % डिस्काउंट आणि शकुलच्या ऑडी कार मधून फ्री मध्ये फिरण्याचा आनंद लुटता येईल. या बरोबर तो जे करू शकत नाही त्या बद्दलही त्याने सविस्तर लिहिलं आहे. आता चॉइस तुमची आहे.

मंडळी शकुलने गेल्या वर्षी सुद्धा ही ऑफर दिली होती. त्याने गेल्यावर्षी व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी ५ मुलींची निवड करून त्यांना डेट वर नेलं होतं आणि शेवटी गिफ्ट म्हणून चक्क iPhone 7 दिला होता.

एकंदरीत याला “एकदिवशीय भाडोत्री बॉयफ्रेंड योजना” म्हणू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या सिंगल मैत्रिणीला टॅग करा राव.

 

सबस्क्राईब करा

* indicates required