खड्ड्याने घेतला या माणसाच्या मुलाचा बळी, त्यानंतर त्याने जे केलं ते पाहून तुम्हीही त्यांना सलाम ठोकाल !!

मुंबई सारख्या धावत्या शहरात रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या खूप मोठी आहे. पावसाळ्यात तर या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात घडतात. अनेकांचा जीव जातो. अशाच एका अपघाताचा बळी ठरला प्रकाश बिल्होरे (वय १६). जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड वरून येताना एका खड्ड्यात बाईक घसरल्याने त्याचा जीव गेला. ही तारीख होती २८ जुलै, २०१५. खड्ड्यांमुळे बळी जाणाऱ्यांपैकी तो एक होता. पण त्याच्या मृत्यूने एक वेगळी सुरुवात झाली.
प्रकाशच्या मृत्यूने त्याचे वडील दादाराव बिल्होरे हे खचून गेले नाहीत. उलट त्यांनी पुढे जे केलं त्यामुळे सर्वांसमोर एक आदर्श उभा राहिला. आपल्या मुलासारखाच इतरांचाही खड्ड्यामुळे जीव जाऊ नये म्हणून त्यांनी चक्क खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली. त्यांचं काम मागील ३ वर्षांपासून अविरत सुरु आहे.
मंडळी, या मोहिमेमुळे आजवर तब्बल ५५६ खड्डे बुजवण्यात आले आहेत. या कामासाठी लागणारी साधनं ते स्वखर्चातून आणतात. अनेकांना हा वेडेपणा वाटतो. पण त्यांनी मात्र ठरवलंय, ‘जो पर्यंत भारत खड्डे मुक्त होत नाही तो पर्यंत मी हे काम करत राहणार’
दादाराव बिल्होरे यांनी एका मुलाखतीत म्हटलंय की ‘आपल्या देशाची लोकसंख्या मोठी आहे, त्यातील निदान १ लाख लोकांनी पुढाकार घेतला तरी आपला देश खड्डेमुक्त होऊ शकतो.’ त्यांच्या जिद्दीला बोभाटाचा सलाम !!
आणखी वाचा :
मुंबई अटकली, मलिष्काची सटकली - सोनू नंतर मलिष्का घेऊन आली आहे झिंगाट...व्हिडीओ पाहिलात का ??