डेडलाईन ही एकेकाळी खरोखरीची 'डेड'लाईन होती ?? जाणून घ्या डेडलाईन शब्दांमगाचा रंजक इतिहास !!

हल्ली आपण डेडलाईन हा शब्द सर्रास वापरतो. ऑफिस मध्ये ठराविक काम ठराविक वेळेत करण्यासाठी एक डेडलाईन दिली जाते. अर्थात काम पूर्ण करून देण्याची मर्यादा म्हणजेच ‘डेडलाईन’. नावात जरी ‘डेड’ शब्द असला तरी ती ठराविक वेळ निघून गेल्यावर कोणी तुमचा जीव घेणार नसतो. पण एक काळ असा होता जेव्हा खरच जीव घेतला जायचा.

मंडळी, आजच्या काळात आपण ‘डेडलाईन’ शब्दाला घाबरतो तसच फार वर्षापूर्वी देखील घाबरायचे. आज आम्ही तुम्हाला आपल्या रोजच्या वापरातील ‘डेडलाईन’ शब्दाच्या जन्माची कथा सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया हा शब्द आला तरी कसा !!

या शब्दाचा मूळ कुठे आहे ?

स्रोत

डेडलाईन शब्द हा १८६० सालापासून वापरात आहे. त्याकाळात कैद्यांसाठी एक सीमा आखलेली असायची. या सीमेपलीकडे गेल्यास त्याला गोळ्या झाडून ठार केलं जायचं. त्या सीमेला उद्द्येशून ‘डेडलाईन’ शब्द तयार झाला. 

अमेरिकेत यादवी युद्ध सुरु असताना जोर्जियातील एंडरसनव्हील येथे एक नवीन तुरुंग तयार करण्यात आला होता. हा तुरुंग तिथल्या छाळासाठी आणि शिक्षेसाठी ओळखला जायचा. छळाला वैतागून बऱ्याचदा कैदी तुरुंगातून पळून जायचे. त्यामुळे तिथे एक रेषा आखण्यात आली होती. त्या रेषेच्या पलीकडे एक बोट जरी गेलं तरी त्या कैद्याला गोळ्या घालण्यात यायच्या. त्याकाळात खऱ्या अर्थाने ही ‘डेड-लाईन’ होती.
हा शब्द पहिल्यांदा कुठे वापरला गेला यावर आजही तज्ञांमध्ये वाद आहेत. पण हा शब्द अमेरिकेतल्या यादवी युद्धाच्या काळात तयार झाला यावर जवळजवळ सगळ्यांनीच शिक्कामोर्तब केलं आहे. 

स्रोत

यादवी युद्ध संपल्यानंतर हा शब्द वर्तमानपत्र, पुस्तके, मासिके यातून दिसू लागला. या शब्दाला धरून असलेली मरणाची भीती तो पर्यंत निघून गेली होती. पण या शब्दाचा दबदबा मात्र कायम राहिला. पुढे जाऊन डेडलाईनला वेळेशी जोडले गेले. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी दिलेला टार्गेट हा आजही “डेडलाईन” म्हणूनच ओळखला जातो.

मंडळी, तुम्ही ज्या शब्दाला आज घाबरता तो जवळजवळ १५० वर्ष जुना आहे राव.

 

आणखी वाचा :

समोश्याच्या पोटात दडलाय इतका मोठा इतिहास...वाचा समोसा भारतात आला तरी कसा !!

सबस्क्राईब करा

* indicates required