३१ डिसेंबरच्या आता तुमच्या बँक खात्याला जोडा आधार, जाणून घ्या तुमचं खातं जोडलेलं आहे का?

पॅन कार्डला आधार देऊन झाला. आता पुन्हा आपल्या सगळ्यांनाचा तर एक नवं काम सरकार कृपेने आपल्याला करावं लागणार आहे. आता आपल्या बँक खात्यांना म्हणे आधार कार्ड जोडावे लागणार आहे. तर या साठी सरकारनं डेडलाईन दिली आहे 31 डिसेंबर 2017 ची. उगाच शेवटच्या क्षणी घाई नको त्यामुळे आजच्या आजच आपण हे काम आटपून घेऊयात. 

तसं तर आधार आणि बँक खाते जोडून घ्यायच्या अनेक पद्धती आहेत. त्यात बँकेत जाऊन आपल्या आधार कार्डची झेरॉक्स देणे हा तसा सोपा उपाय आहे, पण सरकारनं डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे आणि प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि अंबानी कृपेने इंटरनेट आहे. तर आता या खालच्या स्टेप्स वापरा आणि बघा आहे का तुमचं आधार आणि बँक खातं लिंक झालं आहे का ते..

1. सगळ्यात आधी तुमच्या ब्राउझर मध्ये www.uidai.gov.in या साईटवर जा.

2. इथे तुम्हाला "Check Addhar & Bank Account Linking Status"  दिसेल त्या लिंकवर क्लिक करा

3. या स्क्रीनवर तुमचा आधार नंबर आणि सिक्युरिटी कोड टाकून सेंड ओटीपी बटण दाबा

4. तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी एसएमएसने येईल.

5. या स्क्रीनवर उजव्या बाजूला ओटीपी टाका

6. त्यानंतर तुम्हाला तुमचं बँक खाते जोडलेलं आहे का? कधी जोडलं आहे. अशी सगळी माहिती मिळेल

काय, तुमचं आधार आणि बँक खाते जोडलेलं नाहीय्? काही टेन्शन घेऊ नका. आत्ताच्या आत्ता तुमच्या इंटरनेट बँकिंग खात्यात लॉगिन करा, तिकडे तुम्हाला आधार जोडण्याचा ऑप्शन सापडेल. आधारशिवाय फोन नंबर आणि इतर काही डिटेल्स भरा आणि सबमिटवर क्लिक करा. त्यांनतर तुम्हाला ओटीपी येईल ती सबमिट केलं की तुमचं लिंकिंग झालं. 
काय, तुमच्या कडे नेटबँकिंग नाहीय? मग जा राव बँकेच्या ब्रँचमध्ये आणि भरा फॉर्म...

सबस्क्राईब करा

* indicates required