computer

आता फेसबुक कमेंट्स, चॅट्स आणि स्टोरीजमध्ये वापरा तुमचा स्वतःचा अवतार : कसा बनवायचा ते शिकून घ्या...

गेले दोन दिवस तुमचे फेसबुक मित्र त्यांच्या वॉलवर वेगवेगळे अवतार पोस्ट करत आहेत ना? इंग्रजीनं आपला संस्कृत अवतार शब्द केव्हाच आपलासा केलाय आणि आता फेसबुक आपल्याला आपला अवतार तयार करायला मदत करत आहे. फक्त हा देवांच्या बऱ्याच जन्मांपैकी एक असतो तो अवतार नाही, तर "काय अवतार केला आहेस?" मधला अवतार आहे इतकंच!!

फेसबुक आपल्या युझर्ससाठी नेहमीच नवनवीन फिचर्स आणत असतं. नुकतंच फेसबुकने Bitmoji हे ॲप आणि आयफोनच्या Memoji या फिचरशी टक्कर द्यायला भारतीय वापरकर्त्यांसाठी 'अवतार' फिचर आणलंय. आतापर्यंत आपण फेसबुक कमेंट्स आणि चॅट विन्डोमध्ये वेगवेगळ्या इमोजी, स्टिकर्स, GIF वापरून स्वःच्या भावना व्यक्त करत होतो. या जोडीला आता तुमचा अवतारही आलाय.

या फिचरच्या सहाय्यानं तुम्ही फेसबुकवर तुमच्यासारखंच दिसणारं एक कार्टून पात्र बनवू शकता. नमस्ते, हाय, बाय, बधाई हो, गुड लक अशा वेगवेगळ्या अंदाजात हा तुमचा अवतार तुम्ही कमेंट्स, चॅट, स्टोरीजमध्ये वापरू शकता. प्रोफाईल फोटोसाठीही तुम्ही तो वापरू शकता आणि व्हाट्सॲपवर शेअरही करू शकता.

कसा बनवाल स्वतःचा अवतार?

१. सर्वात आधी तुमचं‌ फेसबुक ॲप प्ले स्टोअर वरून अपडेट करून घ्या.

२. फेसबुक ॲपमध्ये उजव्या बाजूला वरती दिसणाऱ्या तीन रेषांवर टॅप करा.

३. इथे खाली‌ See More हा पर्याय असेल. त्यावरती टॅप करा.

४. See More उघडल्यानंतर तुम्हाला ‌Avtars हा बुकमार्क दिसेल. तो उघडा.

आता तुम्ही तुमच्या ‌चेहऱ्याचा रंग, हेअरस्टाईल, केसांचा रंग, चेहऱ्याचा आकार, चेहऱ्यावरचे डाग आणि रेषा, डोळ्यांचा आकार आणि रंग, भुवयांचा आकार आणि रंग, नाकाचा आकार, वेगवेगळे चष्मे, ओठांचा आकार, दाढी-मिश्या, तुमच्या शरिराचा आकार, वेगवेगळ्या पध्दतीचे कपडे, डोक्यावरची टोपी, नाकातले, कानातले, टिकली... अशा सगळ्या गोष्टी तुमच्या स्वःतासारख्याच कस्टमाईझ करू शकता.

शेवटी Done वर क्लिक करून हा अवतार सेव्ह करा. कमेंट्स करताना तुम्हाला इमोजी आणि GIF जिथे दिसतात तीथेच 'अवतार'चं चिन्हही दिसेल.

हे अवतार जर तुम्हाला फेसबुक मेसेन्जरवरती चॅट करताना वापरायचे असतील‌ तर ते तुम्ही वरती सांगितल्याप्रमाणे Avtars हा पर्याय उघडून तिथून शेअर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required