computer

चायनीज मोबाईल्सना पर्याय असलेले तेवढ्याच चांगल्या दर्जाचे मोबाईल फोन्स !!

एकेकाळी हिंदी-चीनी भाईभाई म्हणत चीननं भारताला फसवलं. पण आता काही ही फसवेगिरी चालायची नाही. भारत आणि चीन यांच्या दरम्यान होणारा संघर्ष आता आपल्याला काही नवीन नाही. चीनची सध्याची घुसखोरी तर अतिच झालीय. सबब चायनीज वस्तूंवर बहिष्कार घालण्याची इच्छा आणि मागणी, दोन्हींनी अगदी जोर धरलाय.

चीनमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असल्यामुळे चीन अत्यंत कमी दरात काही वस्तू संपूर्ण जगभरात उपलब्ध करून देतो. भारतातही बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि मोबाईल्स चीनमधून आयात केले जातात. त्यातल्या त्यात मोबाईल्सचा खप तर खूप जास्त आहे. भावनिक होऊन भारतीयांना हे चायनीज कंपनीचे मोबाईल घ्यायचे नसतील तर त्यासाठी दुसरा कुठला चांगला पर्याय आपल्याकडे आहे का हा प्रश्न कुणालाही पडेल. आज या लेखामध्ये आम्ही या प्रश्नाची काही उत्तरं घेऊन आलो आहोत.

भारतात चायनीज कंपन्यांखेरीज कोरिया, युरोप, तैवान आणि अमेरिका या देशांतल्या कंपन्यांचेदेखील मोबाईल्स उपलब्ध आहेत. ही उत्पादनं चायनीज उत्पादनापेक्षा नक्कीच चांगल्या प्रतीची आहेत. आपण जर बजेटनुसारच विचार केला तरीही ही उत्पादने चायनीज उत्पादनांना नक्कीच मागे टाकतील.

Realme Narzo 10 A

रियलमी या कंपनीचा कमी किंमतीत उपलब्ध असलेला हा सर्वात चांगला फोन म्हणून सांगितला जातो. यामध्ये कॉल ऑफ ड्यूटी आणि पब्जीसारखे ऍडव्हान्स गेमदेखील तुम्हाला खेळता येऊ शकतात. या मोबाईलमध्ये तुम्हाला 6.5 इंच एलसीडी स्क्रीन मिळते. यासोबतच रिझोल्युशन ट्रिपल कॅमेरा यासारखे अत्याधुनिक फिचरदेखील तुम्हाला या मोबाईलमध्ये मिळू शकतात. पण जर रियलमीऐवजी तुम्ही आणखी पर्याय शोधत असाल तर Samsung Galaxy M20  हा सर्वात चांगला मोबाईल आहे. ह्या मोबाईलला 6.3 इंच एवढी स्क्रिन असून त्यासोबतच तुम्ही इतरही सर्व प्रकारचे गेम्सही या मोबाईलमध्ये खेळता येतील.  या मोबाईलचा कॅमेरा देखील १३ मेगापिक्सेलचा आहे.  इतर चायनीज मोबाईलच्या तुलनेत विचार केला तर हा मोबाईल कधीही त्याहून सरसच ठरेल.

जर तुमचं बजेट अजून चांगलं असेल तर तुम्ही Xiaomi Redmi Note 9 pro max या मोबाईलचा विचार नक्कीच केला असेल. कारण या मोबाईलमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे व्हेरिएशन्स मिळतात आणि हे सर्व व्हेरिएशन्स भारतात चांगलेच प्रसिद्ध आहेत. वीस हजाराच्या रेंजमध्ये मिळणारे रेडमी आणि रियलमीचे मोबाईल हे इतर मोबाईलपेक्षा जास्त प्रमाणात विकले जातात. ह्या मोबाई मध्ये स्नॅपड्रॅगन सेवन सिरीज प्रोसेसर वापरण्यात आलेला आहे. यामुळे तुम्हाला मोबाईल चांगल्या पद्धतीने हाताळायला मदत मिळते.

पर्याय

वरील मोबाईल्सला पर्याय म्हणून तुम्ही Nokia 8.1, samsung galaxy M31 हे मोबाइल वापरावेत असा सल्ला आम्ही तुम्हाला देत आहोत.  कारण वरील चायनीज मोबाईलमध्ये उपलब्ध असणारे सर्व प्रकारचे फिचर्स तुम्हाला या मोबाईलध्ये सुद्धा नक्कीच मिळतील. त्यासोबतच स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि मोबाईलची inbuild storage सुद्धा तुम्हाला जास्त मिळेल ज्यामुळे हे मोबाईल चायनीज उत्पादनापेक्षा चांगले ठरतात.

आपल्याकडे असा सुद्धा वर्ग आहे जो 70-80 हजार रुपये किंमतीचाही चायनीज मोबाईल विकत घेतात. असे महागडे चायनीज मोबाईल घ्यायची जणू फॅशन निघालेली आहे. One plus 8, Realme 2 pro, redmi k20 pro हे अत्यंत महागडे समजले जाणारे मोबाईलदेखील आपल्याकडे काही मिनिटांत विकले जातात. अगदी मागच्या काही वर्षांत तर हे मोबाईल म्हणजे ब्रँड आहेत अशा पद्धतीने पाहिले जात आहे. पण तुम्हाला जर चायनीज उत्पादन घ्यायची नसतील तर अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. Asus 6z, ROG phone 2, samsung galaxy Note 10 lite, Samsung galaxy S10 lite, iphone SE 2020 हे सर्व मोबाईल्स चायनीज उत्पादनांपेक्षा अत्यंत चांगल्या प्रतीचे आहेत आणि फक्त आशियामध्येच नव्हे, तर संपूर्ण जगभर यांना प्रथित यश कंपनी म्हणूनच बघितले जाते. त्यामुळे तुम्हाला महागडा मोबाईल घ्यायचा असेल तर वरील मोबाईलचा पर्याय तुमच्याकडे नक्कीच उपलब्ध असेल.

 

लेखक : रोहित लांडगे

सबस्क्राईब करा

* indicates required