computer

बाबो, मेथी समजून चक्क गांजाची भाजी खाल्ली? कुठे घडलंय हे?

उत्तर प्रदेशात एक विचित्र घटना घडली आहे. मेथी समजून चक्क गांजाची भाजी एका कुटुंबात शिजवण्यात आली आणि घरातील सहा लोकांना दवाखान्यात दाखल करावे लागले.

उत्तर प्रदेशातील कनोज येथील मियागंज या गावात एक नितेश नावाचा माणूस राहातो. साहेबांनी एका भाजीवाल्याकडून मेथीची भाजी खरेदी केली. त्याला आपल्याला दिलेली भाजी मेथी नसून गांजा आहे हे कळलेच नाही. त्याने घरी येऊन ती भाजीपाल्याची पिशवी त्याच्या मेहुणीला दिली.

हुशार भाऊजींच्या अतिहुशार मेहुणीलाही ही भाजी कशाची आहे कळाले नाही. संध्याकाळच्या जेवणात तिने ती रांधून सगळ्यांना वाढली. असं म्हणतात की संध्याकाळी पाचच्या सुमारास सगळ्या कुटुंबाने ती भाजी खाल्ली.

थोड्या वेळाने सगळ्या कुटुंबाला त्रास व्हायला लागला. त्यांनी शेजारच्या लोकांना डॉक्टरांना बोलवायला सांगितले. शेजारच्यांनी तात्काळ डॉक्टरांनाबोलवून घेतले. त्या कुटुंबाला दवाखान्यात हलवण्यात आले. शेजारच्यांनी सोबतच पोलिसांना सुद्धा बोलवून घेतले. पोलिसांनी घरात तपासणी केल्यावर त्यांना कढईत गांजाची भाजी दिसली त्याचबरोबर पॉकेटमध्ये उरलेला गांजा दिसला. पोलिसांनी तात्काळ त्या भाजी विक्रेत्याला अटक केली.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने म्हटले की थट्टा म्हणून मी त्यांना गांजा दिला होता. त्याच्या मस्करीची कुस्करी तर झालीच, पण गांजा मेथीच्या भावाने विकल्याने त्याला किती तोटा झाला असेल?

तर ते असोच. मेथी आणि गांजामध्ये फरक न कळणाऱ्या लोकांच्या बायकांनी नवऱ्याला खरेदीला पाठवताना अशी यादी करुन द्यावी का? पण मग त्या मेहुणीचं काय?

सबस्क्राईब करा

* indicates required