आधारकार्ड लिंक करणं शिकलात ? आता डी-लिंक करणं शिकून घ्या भाऊ...आधारकार्ड क्रमांक परत घेण्यासाठी हे करा !!

बँक अकाऊन्ट आणि सीमकार्डला आधारकार्ड जोडण्याची आता गरज नाही. या निर्णयाने तुमच्या आधारकार्ड मध्ये असलेली गोपनीय माहिती बँक किंवा इतर कंपन्यांना मिळू शकणार नाही. पण कोर्टाचा निर्णय येण्याआधीच अनेकांनी आधारकार्ड बँक अकाऊंट व सीमकार्ड सारख्या सर्व्हिसेसला लिंक केला आहे. यापूर्वीच आधारकार्ड लिंक केलेल्यांच काय होणार असा प्रश्न पडला असेल ना ?
तुम्ही सुद्धा आधारकार्ड लिंक केला असेल तर घाबरू नका !! आता कायदेशीररीत्या आधारकार्ड डी-लिंक करण्याची पद्धत उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही तुमचा आधारकार्ड क्रमांक जोडलेल्या सर्व्हिसेस मधून परत घेऊ शकता.
आता समजून घेऊया डी-लिंक करायचं कसं !!
१. बँक अकाऊंटशी जोडलेला आधार नंबर काढून घेण्यासाठी तुम्ही बँकेत अर्ज भरू शकता.
२. अशाच प्रकारे टेलिकॉम कंपनीला अर्ज पाठवून तुमचा आधार नंबर डी-लिंक करता येऊ शकतो.
३. डिजिटल वॉलेट जसे की पे-टीएम पासून आधार डी-लिंक करण्यासाठी 01204456456 या कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क करा. तुम्ही त्यांना आधार डी-लिंक करण्यासाठी ई-मेल पाठवण्याची विनंती करू शकता. त्यांनतर तुम्हाला पे-टीएमकडून एक ई-मेल पाठवली जाईल. या ई-मेल द्वारे तुम्ही अकाऊंट डी-लिंक करू शकता.
मंडळी, आधारकार्ड मध्ये लपलेली आपली माहिती गोपनीय ठेवण्यासाठी आजच आधार डी-लिंक करून घ्या. ज्यांनी अजून आधार लिंक केलेला नाही त्यांची तर बल्लेबल्ले झाली ना राव !!
आणखी वाचा :