computer

माणूस इतर प्राण्यांपासून उत्क्रांत झाला असता तर असा दिसला असता.. ४०० वर्षांपूर्वी एका चित्रकाराने मांडलेली कल्पना पाह्यलीच पाहिजे!!

डार्विन म्हणतो की माणूस माकडांपासून उत्क्रांत झाला आहे. हेच आपल्याला शाळेतही शिकवलं जातं. काही लोक मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या कल्पनेचे घोडे दामटवतात. डार्विनच्याही आधी म्हणजे १६१० साली जन्मलेला फ्रान्सचा चित्रकार चार्ल्स ले ब्रून याने एक वेगळी कल्पना मांडली होती.

चार्ल्स ले ब्रून हे फिजीओनॉमीचे अभ्यासक होते. फिजीओनॉमी म्हणजे चेहऱ्याच्या दिसण्यावरून माणसाच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा. फिजीओनॉमीचा अभ्यास करतानाच चार्ल्स ले ब्रून यांना कल्पना सुचली की माणूस जर प्राण्यांपासून उत्क्रांत झाला असेल तर? त्यांनी ही कल्पना सिद्ध करण्यासाठी डार्विनप्रमाणे कोणतेही वैज्ञानिक सिद्धांत मांडले नाहीत. ते एक चित्रकार होते आणि त्या नात्याने त्यानी आपल्या ब्रशच्या माध्यमातून ही कल्पना मांडली. या कामात त्यांना त्यांचा फिजीओनॉमीचा अभ्यास चांगलाच कामी आला हे त्यांच्या चित्रांवरून दिसतं.

डार्विन प्रमाणे चार्ल्स ले ब्रून यांनी फक्त माकडांवर लक्ष केंद्रित केलं नाही, तर इतर सर्व प्राण्यांचा विचार करून त्यांनी आपली चित्र साकारली. माणूस जर माकड सोडून इतर प्राण्यांपासून उत्क्रांत झाला असता तर कसा दिसला असता याचे उत्तम नमुने चार्ल्स ले ब्रून आपल्या समोर ठेवतात. पुढे जाऊन डार्विनने ऐतिहासिक असा उत्क्रांतिवाद मांडला असला तरी चार्ल्स ले ब्रून यांची कल्पना कौतुकास्पदच राहते.

चला तर जास्त वेळ न दवडता आज पाहूया वेगवेगळ्या प्राण्यांपासून उत्क्रांत झालेला माणूस.

१. माकड

२. घुबड

३. डुक्कर

४. सिंह

५. रॅकून

रॅकून हा लांब शेपटीचा व अंगावर दाट केस असलेला मांसभक्षक प्राणी असतो. भारतात हा आढळत नाही.

६. उंट

७. पोपट

८. मांजर

९. अस्वल

१०. बैल

सबस्क्राईब करा

* indicates required