computer

LIC पॉलिसीला PAN असे लिंक करा, नाहीतर नॉमिनीला २०% टॅक्स भरावा लागू शकेल!!

पॅन कार्डला आधार लिंक करणे लोकांचे अजूनही सुरू आहे. आजवर कित्येकांचे हे लिंक करून झाले आहे. राहिलेले भविष्यात करतीलच, पण अजून एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी लोकांना पॅन लिंक करावे लागणार आहे. ते म्हणजे एलआयसी पॉलिसी. एलआयसीने आपल्या ग्राहकांना संदेश पाठवून आपल्या ग्राहकांनी पॅन विमा पॉलिसीसोबत लिंक करावा असे सांगितले आहे.

ज्यांनी आधीच पॉलिसी घेतली आहे त्यांनाच हे लिंक करावे लागणार आहे. जे नवीन पॉलिसी घेतील त्यांना पॉलिसी घेण्यावेळीच ही सोय उपलब्ध करून देण्यात येईल. पण यातही पॉलिसी पॅन कार्डसोबत का लिंक करावी असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

एका वेबसाईटनुसार जर तुम्ही पॉलिसीला पॅन लिंक केले असेल तर एलआयसी क्लेम घेताना ग्राहकांच्या नॉमिनीला २ टक्के टॅक्स भरावा लागेल. पण जर पॅन लिंक नसेल तर तब्बल २० टक्के टॅक्स भरावा लागू शकतो. पॅनच्या माध्यमातून एलआयसी इन्कम टॅक्स विभागाला याची माहिती पाठवेल.

आता पॅन विमा पॉलिसीला कसे लिंक करावे हे जाणून घ्या.

१) Licindia.In या वेबसाईटवर जाऊन लॉगइन करावे.

२) होम पेज आल्यावर तिथे डाव्या बाजूला ऑनलाइन सर्व्हिसेसमध्ये ऑनलाईन पॅन रजिस्ट्रेशन ही पहिलीच लिंक आहे, तिच्यावर क्लिक करावे.

३) ऑनलाईन पॅन रजिस्ट्रेशन नंतर proceed यावर क्लिक करावे.

४) आता तुम्हाला इथे जन्मतारीख, पॅन नंबर, पॉलिसी नंबर, इमेल, मोबाईल नंबर टाकायचे आहे. एकापेक्षा जास्त पॉलिसी असेल तर तसेही ऍड करता येते.

५) आता कॅपचा टाकून ओटीपी मागवावा.

६) ओटीपी टाकून फॉर्म समबीट करावा.

७) बस! इतके केल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मॅसेज येईल आणि तुमचे पॅन पॉलिसीला लिंक झाले असेल.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required