computer

लॉकडाऊनच्या काळात, वाघ-सिंह-पांडा-शार्क मोबाइलवरून येतील थेट तुमच्या घरात!!

आज आम्ही एक मस्त गम्मत घेऊन आलो आहोत. ही गम्मत तुमच्या घरातल्या लहानग्यांसाठी आहे. अॅपल किंवा ॲंड्रॉईड अशा दोन्ही फोन्समध्ये हे शक्य असल्याने सगळ्यांनाच जमण्यासारखं आहे. चला तर सुरुवात करूया.

तर, सर्वात आधी गुगलवर जाऊन कोणताही प्राणी सर्च करा. समजा तुम्ही वाघ सर्च केला तर तुमच्या समोर वाघाची माहिती येईल. त्या माहितीच्या थोडं खाली View in 3D हा पर्याय दिलेला असेल. या पर्यायावर क्लिक करा.

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तो प्राणी तुमच्या समोर 3D रूपाने येईल. एवढंच नाही तर खाली दिलेल्या View In Your Place या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा कॅमेरा ऑन होईल आणि तो प्राणी तुमच्या घरात प्रकट होईल. हीच तर आहे खरी गम्मत. या प्राण्यासोबत तुम्ही फोटो घेऊ शकता. वाघ, चित्यासारखा प्राणी तर तुमच्या घरात फिरतानाही दिसेल.
आम्हाला सापडलेल्या प्राण्यांची यादी पाहा.

सिंह, वाघ, चित्ता, शार्क, बदक, पेंग्विन, लांडगा, बकरी, साप, गरुड, अस्वल, मगर, घोडा, कासव, मांजर, कुत्रा.

 

या प्रकाराला Augmented Reality म्हणतात. Augmented Reality म्हणजे खऱ्या आयुष्यातील गोष्टींना कॉम्प्यूटरद्वारे नवीन टच देऊन सादर केलं जातं. Augmented Reality मध्ये फक्त एखादी गोष्ट समोर उभीच करता येत नाही तर त्याला आवाजही जोडता येतो. काही वर्षापूवी पोकेमॉन पकडण्याचा खेळ प्रसिद्ध झाला होता. तो खेळी याच Augmented Reality वर आधारित होता. 

Augmented Reality म्हणजे Virtual Reality (आभासी विश्व) चाच भाऊ. हे दोन्ही प्रकार भविष्यात जगाचा ताबा घेणार आहेत. प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतातच तसे यांचेही आहेत. आपण आज फायद्याचच बोलू. Virtual Reality आणि Augmented Reality चा वापर जर शिक्षण क्षेत्रात केला तर नक्कीच क्रांती घडेल. या पद्धतीने मुलांना जास्तीतजास्त चांगल्यारितीने शिकवता येऊ शकतं. 

चला तर आज ही गम्मत करून बघा. लहानगे तर खुश होतीलच पण तुम्हालाही नवीन केल्याचा आनंद मिळेल. तुम्हाला कोणकोणते प्राणी गावासले ते नक्की सांगा आणि हो स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required