आर्मी ट्रेनिंगचा अमानुष व्हिडीओ..

तर मंडळी आपण आपल्या आर्मीचे कौतुक करतो, सैनिकांच्या शौर्याच्या गप्पा आपल्या घरात बसून मारतो. आर्मीमधल्या ह्या शिक्षेच्या 10% जरी आपल्याला भोगावं लागलं तर आपली वाट लागेल. तर ह्या व्हिडीओमध्ये एका ट्रेनीला सपासप मारलं जातंय, कोणत्याही प्रकारची बचावाची संधी न देता मारण्याचा हा अमानुष व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आर्मी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. सैन्याची शिस्त समजू शकते पण अशा प्रकारची मारहाण असमर्थनीय आहे.

 

या प्रकारानंतर आर्मीला आपल्या ऑफिशियल चॅनलवर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा व्हिडीओ जुना आहे आणि त्यात दिसणाऱ्या दोषी लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे.