या माणसाने मारलाय कांगारूला बुक्का, चूक की बरोबर यावरून भांडतंय जग..

तर भाऊ हा व्हिडीओ लैच व्हायरल झाला आहे ना?  इंडिपेंडंट या युकेमधल्या न्यूजपेपरनं हा व्हिडीओ ऑनलाइन टाकल्यापासून तो 2 करोडपेक्षा जास्तवेळा पाह्यला गेलाय.  इतर चॅनलवरही साधारण हाच आकडा या व्हिडीओनं गाठलाय.  इतकंच नाही, तर या व्हिडीओवर आलेल्या 30,000 पेक्षा जास्त कमेंटमध्ये लोकांनी हे चूक की बरोबर यावर प्रचंड वाद घातलाय.

तर हा किस्सा  घडलायऑस्ट्रेलियामध्ये.  ग्रेग टँकिन्सन नावाचा माणूस जंगलात गेला होता, त्याला अचानक असं दिसलं की त्याचा कुत्रा मॅक्सला एका कांगारूनं धरलंय. ग्रेग पळत तिकडे गेला. आपल्याला व्हिडिओत असं दिसतं की  कांगारू पण त्याच्यासमोर उभं राहातं.  दोघंही एखाद्या रिंगमधल्या बॉक्सरसारखी पोज घेतात आणि अचानक ग्रेग कांगरुला एक पंच मारतो. कांगारू काही सेकंदासाठी सुन्न उभं राहातं आणि मग पळून जातं.

अनिमल राईट्सवाले ह्या प्रकाराने खुश नाहीयेत. त्यांच्यामते ग्रेगनं कांगारूला मारणं गरजेचं नव्हतं. त्याला नुसतं घाबरवून पण प्रॉब्लेम सोडवता आला असता. तर दुसऱ्या बाजूने आजवर कांगारूंनी केलेल्या हल्ल्याचे दाखले दिले जात आहेत. तर या वादात तुम्ही कोणत्या बाजूनं आहात?