व्हिडिओ- हिंदी सिनेमानं इतकी वर्षं केली मुलींची छळणूक..

Subscribe to Bobhata

हिंदी सिनेमानं प्रेक्षकांना मुलगी पटवायचा एक मार्ग दाखवलाय, तो म्हणजे, "इन्कारमें इकरार है". आधी त्या मुलीच्या मागं लागायचं, तिला छळायचं आणि मग ना-ना करणारी ती अखेर हो म्हणते. डीडीएलजे मधला काजोल-शाहरूख भेटतात तो प्रसंग आठवा. तो तिच्या विनाकारण अंगचटीला काय येतो, तिची अंतर्वस्त्रं पताकेसारखी काय फडकवतो.. असं जर प्रत्यक्ष आयुष्यात झालं तर ती मुलगी त्या मुलाच्या प्रेमात पडण्याची शक्यता दूरच, त्याच्याशी बोलणारसुद्धा नाही. 

 बॉलीवूडच्या सिनेमांत मुलींना छळण्यासाठीच्या प्रसंगांसाठी कित्येक गाणी आहेत. ती गाणी वापरून किती रोडरोमिओंनी मुलींना विनाकारण छळलं असेल याची गणती नाही. या अशाच गाण्यांवर आधारित एआयबी या चॅनेलनं काल रिलीज केलाय. या व्हिडिओमध्ये मसान सिनेमातल्या जोडीनं म्हणजेच रिचा चढ्ढा आणि विकी कौशल या जोडीनं काम केलंय.. 

या व्हिडिओवरून कुणी काही बोध घेतला तर बरं होईल..

सबस्क्राईब करा

* indicates required