या पोलिस हवालदाराने अनवाणी डोंगर चढून या माणसाचे प्राण वाचवले..

Subscribe to Bobhata

आपल्या चित्रपटात नेहमीच पोलिसांचं चित्रण एकतर एकदम भ्रष्ट सत्तेचा माज असणारे असं केलं जातं किंवा दुसऱ्या बाजूला  एकदम सर्वगुण संपन्न हिरो. खरं पाहिलं तर पोलिसाची नोकरी काही सोपी नसते. नेहमीचाच बंदोबस्त आणि ड्युटीचं स्वरूप पाहता त्यांच्याकडे स्वतःसाठी वेळ नसतोच. हे सगळं पाहता जेव्हा मुंबई पोलीस  एखाद्या कॉन्स्टेबलचं कौतुक करणारं ट्विट करतात तेव्हा त्याची दखल घ्यायलाच हवी. नाही का?

 

तर अंधेरीच्या साकीनाका भागात घडलेली ही घटना आहे. एक माणूस आत्महत्या करण्यासाठी डोंगरावर चढला. कुणीतरी १०० नंबरला फोन करून कळवलं. जवळच काम करणार्‍या कॉन्स्टेबल सुहास नेवासे यांनी वेळीच पावलं उचलली आणि अनवाणी डोंगर चढून गेले. वर जाऊन त्यांनी साधारण अर्धातास त्या माणसाला समजावलं आणि खाली घेऊन आले.

अशा जी-जानसे  काम करणाऱ्या आपल्या पोलीस दलाला आमचा बोभाटा सलाम.

सबस्क्राईब करा

* indicates required