१० वर्षांचा मराठी वंडरबॉय : स्टंट्स पाहून थक्क व्हाल!!

Subscribe to Bobhata

 साधारण  १०-१२ वर्षाचे असताना आपण काय करायचो? लिहा-वाचायला, सायकल मारायला शिकायचो, पोहायला शिकायचो, आणि या सगळ्या बाबतीतही आपल्या प्रगतीचा आलेख हा अडखळतच चालायचा. पण यालाही काही मुलं अपवाद असतात. ज्यांच्यात काहीतरी असामान्य असतं...

विडिओ मध्ये दिसणारा हा लहानसा बालक आहे रत्नजीत पाटिल. वय वर्षे १०.  पण त्याचं ट्रॅक्टर चालवण्याचं कौशल्य पाहून भलेभलेही तोंडात बोटं घालतात. रत्नजीत चक्क ६ वर्षांचा असल्यापासून ट्रॅक्टर चालवायला शिकतोय. तुम्ही त्याने ट्रॅक्टरवर केलेले चित्तथरारक स्टंट पाहू शकता. हा खेळ धोक्याचा असला तरी तो ते अगदी सराईतपणे आणि न घाबरता करतोय. 

        विशेष म्हणजे रत्नजीतच्या आवडीला त्याच्या घरच्यांनीही प्रोत्साहन दिलंय. अनेक रिअॅलिटी शोजमध्ये रत्नजीत चमकलाय. आणि सोशल मिडीयावरही त्याचं मोठं कौतुक होताना दिसतंय.  इतक्या लहान मुलांच्या हाती वाहन द्यावं का हा मुद्दा आहेच. पण तोवर आपण रत्नजीत कसा ट्रॅक्टर चालवतो ते पाहू..

सबस्क्राईब करा

* indicates required