भारतीय रेल्वेचं दमदार पाऊल : सौर उर्जेवर चालणारी पहिली रेल्वे रुळावर !!

मंडळी भारतीय रेल्वेसाठी आता एक गौरवशाली पर्व सुरु झालंय. शुक्रवारी देशात एक ऐतिहासिक घटना घडली. डीईएमयू म्हणजेच (डिझेल इलेक्ट्रॉनिक मल्टिपल युनिट) ही देशातील पहिली सौर उर्जेवर चालणारी डीझेल रेल्वे सुरु करण्यात आली आहे. आपल्या देशाचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्लीत 'सफदरजंग' येथे या ट्रेनचं अनावरण केलं. खास बात म्हणजे जगात प्रथमच रेल्वेमध्ये सोलर उर्जेचा विद्युत ग्रीड म्हणून वापर करण्यात येणार आहे राव !

Suresh Prabhu Launches India's First Solar Powered Train, Says 24 More To Comeस्रोत

चेन्नईच्या इंटीग्रील कोच फॅक्ट्रीमध्ये ट्रेनला सौर उर्जेसाठी पॅनल लावण्यात आले या पॅनल्समुळे रेल्वेच्या डब्यातील पंखे आणि लाईट चालू शकतील. सौर उर्जेच्या वापरातून डिझेलसाठी लागणाऱ्या रकमेत तब्बल 12 लाख रुपयांची बचत होणार आहे.

ट्रेनची खासियत

indian-railways-solar-powered-train-delhi-2

१. महत्वाची गोष्ट म्हणजे ही रेल्वे मेक इन इंडिया या प्रकल्पातून तयार करण्यात आली आहे.
२. ट्रेनच्या डब्यांच्या छतावर  ४.५ किलोवॅट चे 16 सोलार पॅनल बसवण्यात आलेत त्यामुळे रेल्वेच्या आतील पंखे, लाईट आणि इतर यंत्रणा बिनदिक्कत काम करू शकेल.
३. बॅटरी बँक (पॉवर बँक) ही सुविधा डीईएमयूची खासियत आहे त्यामुळे ७२ तास (३ दिवस) उर्जा साठून राहील.
४. सौर ऊर्जेमुळे तब्बल २१ हजार लिटर डीझेल दरवर्षी वाचणार असून याशिवाय वातावरणात उत्सर्जित होणारा ९ टन एवढा प्रचंड कार्बन कमी होणार आहे.

येत्या ५ वर्षात १००० मेगावॉट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्प तयार करणार असल्याचं म्हटलं जातंय. सध्या दिल्लीच्या सराई रोहल्ला ते हरियाणामधील फारुख नगर पर्यंत ही रेल्वे धावणार असून भविष्यात लांब पल्याच्या गाड्यांच्या काही डब्यावर सौर पॅनल बसवण्यात येतील.

पण काहीही म्हणा राव पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने भारतीय रेल्वेचं हे एक मोठं पाउल आहे. भविष्यात संपूर्ण देशभरात अशीच यंत्रणा तयार व्हावी हीच सदिच्छा !!

सबस्क्राईब करा

* indicates required