computer

आईच्या मृत्यूनंतर १२३ दिवसांनी झाला जुळ्यांना जन्म.. कसा? मग हे वाचाच..

एक गरोदर बाई, जिचा मेंदू मृत पावलाय पण इतर अवयव जिवंत आहेत.. तिला डॉक्टरांनी एक-दोन नाही, चक्क १२३ जिवंत ठेवलं आणि तिच्या जुळ्यांना जन्म दिला. निसर्ग चमत्कार तर करतोच, पण माणूसही काही कमी चमत्कार करत नाही. हो ना?

दक्षिण ब्राझिलमधली २१ वर्षांची फ्रँकलिन दा सिल्व्हा झांपोली पाडिल्हा. तिला  गेल्या वर्षी म्हणजेच २०१६च्या ऑक्टोबरमध्ये मानेत आणि डोक्यात असह्य कळा येऊ लागल्या.  दवाखान्यात नेण्यापूर्वीच ती बेशुद्ध पडली आणि मेंदूत अतिरक्तस्राव झाल्यानं तिचा मत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहिर केलं.

फ्रँकलिन तेव्हा ९ आठवड्यांची गरोदर होती. मेंदू वारला तरी इतर अवयव प्रतिसाद देत होते.  डॉक्टरांनी तिच्या नवर्‍याला –म्युरिएलला सांगितलं की सध्या तरी त्या अर्भकांची हृदयं धडधडत आहेत. आपण तीन दिवसांनी जेव्हा ती बंद पडतील, तेव्हा तिला लावलेली सगळी यंत्रं काढू आणि मग तू तिच्यावर अंत्यसंस्कार करू शकशील. पण.. असं झालं नाही. डॉक्टरांना जे अपेक्षित नव्हतं, ते घडलं. त्या अर्भकांचे अवयव  मृत मातेच्या शरीरात हालचाल करतच राहिले. मग डॉक्टरांनीही फ्रँकलिनला बाळांच्या जन्मापर्यंत जिवंत ठेवायचं ठरवलं. आणि आश्चर्य म्हणजे ती जुळी बाळं आईच्या पोटात वाढत राहिली.

फ्रँकलिन - म्युरिएल

त्या हॉस्पिटलातल्या नसेस आणि डॉक्टरांनी फ्रँकलिनची खोली सजवली. ते येऊन त्या गर्भातल्या बाळांशी गप्पागोष्टी करत. तिथं छानसं संगीत लावून ठेवत. त्या आयसीयुला त्यांनी प्रेम, माया आणि उत्तेजनेनं भारून टाकलं. प्रत्येक वेळेस त्या नर्सेस फ्रँकलिनला भेट देत तेव्हा त्या गर्भातल्या बाळांना “आमचं तुमच्यावर प्रेम आहे” असं सांगत.

होता होता फेब्रुवारी महिना उजाडला आणि डॉक्टरांनी सिझेरियन शस्त्रक्रिया करून या बाळांना जन्म दिला. वेळेपूर्वीच जन्म झाला असला तरी त्यांची वाढ पूर्ण झाली होती. तीन महिने त्या बाळांना इन्क्युबेटरमध्ये ठेवल्यानंतर आता फ्रँकलिनची आई त्यांना वाढवत आहे.

आहे ना आश्चर्यकारक गोष्ट!! आपण विज्ञान शाप की वरदान म्हणतो.. पण अशावेळेस ते शाप आहे की वरदान याचं उत्तर एकच येतं..

सबस्क्राईब करा

* indicates required