computer

अणु बॉंम्बची पहिली टेस्ट केव्हा आणि कुठे झाली? त्याला मॅनहॅटन प्रोजेक्ट का म्हणतात?

आजच्या दिवशी म्हणजे १६जुलैला वर्ष १९४५ मध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास इतिहासप्रसिद्ध मॅनहॅटन प्रॉजेक्टची निर्मिती असलेल्या पहिल्या अॅटम बॉम्बची न्यू मेक्सिकोच्या अलॅमोगोर्डो येथे सफळ चाचणी करण्यात आली.

दुसरं महायुद्ध चालू होतं. मित्रराष्ट्रांनी वर्ष १९३९ मध्ये युरेनियमपासून बॉम्ब बनवण्याची योजना आखली. त्या मागे दोन मुख्य कारणं होती. एक म्हणजे इटलीहून अमेरिकेत स्थलान्तरित झालेले शास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांनी अमेरिकन नेव्हीला दिलेली विखंडनीय मूलद्रव्यांपासून सैन्यासाठी अस्त्र बनवण्याची कल्पना.  आणि दुसरं म्हणजे  त्याच वर्षी प्रसिद्ध संशोधक अल्बर्ट आईन्स्टाईन अनियंत्रित न्युक्लियर चेन रिअॅक्शनद्वारे निर्मिती होऊ शकणार्‍या अतिसंहारक अस्त्रांच्या निर्मितीच्या सिद्धान्ताला दिलेली मान्यता. लगेच पुढच्या वर्षी म्हणजे १९४० मध्ये रुझवेल्ट सरकारनं ६०००डॉलर्सची देणगी देऊन याबद्दलच्या संशोधनाला मान्यता दिली. पुढं वर्ष १९४२ मध्ये अमेरिकाच दुसर्‍या महायुद्धात ओढली गेल्यामुळं आणि जर्मनी स्वतःच युरेनियम बॉम्ब बनवत असल्याची खबर आल्यामुळं अमेरिकेच्या युद्धविभागानं या प्रकल्पात जातीनं लक्ष घालायला सुरूवात केली.

स्फोटाच्या ०.०२५सेकंदानंतरचं दृश्य..

स्वतः शिक्षणाने इंजिनियर असलेले ब्रिगेडीअर-जनरल लेस्ली ग्रूव्ज् यांनी या विषयातील महान तज्ज्ञ एकत्र आणले.  महायुद्धाची समाप्ती घडवण्याच्या दृष्टीने अॅटम बॉम्बची निर्मिती करवण्यासाठी न्यूयॉर्क, मॅनहॅटन इथे प्रकल्पाला सुरूवात केली. त्यामुळं अॅटम बॉंब प्रोजेक्टलाच मॅनहॅटन प्रोजेक्टच म्हटलं जाऊ लागलं.

अनेक प्रयत्नांनंतर वर्ष १९४३ मध्ये रॉबर्ट ओपनहायमर, हान्स बेथ, एडवर्ड टेलर आणि एनरिको फर्मी यांनी अनियंत्रित चेन रिअॅक्शनद्वारे बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया लॉस अॅलामोस प्रयोगशाळेत सुनिश्चित केली. त्यानुसार १६ जुलै १९४३ रोजी न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात संशोधकांनी या बॉम्बचा आवाका जोखला.

स्फोट ज्या ठिकाणी झाला त्या जागेची स्फोटानंतरची स्थिती.

संशोधकांनी स्वतःला या जागेपासून सुमारे दहा हजार यार्ड दूर ठेवून हा प्रयोग पाहिला. यावेळी बॉम्ब फुटून तयार झालेला अळंबीसदृश्य आकार अवकाशात सुमारे चाळीस हजार फूट पसरला. त्याची संहारकता पंधरा ते वीस हजार टन स्फोटकांइतकी होती. बॉम्ब ज्या लोखंडी टॉवरवर बसवलेला त्याचा मागमूसही उरला नाही.

 

बॉम्ब बसवलेला लोखंडी टॉवर..

पुढचा प्रश्न हाच होता की बॉम्ब कुणावर टाकायचा. जर्मनीने तोवर शरणागती पत्करल्यामुळे त्याचा वापर जपानविरुद्ध केला गेला. 

मूळच्या ६०००डॉलर्सच्या खर्चानं सुरू झालेल्या मॅनहॅटन प्रकल्पाचा एकूण खर्च २०० करोड डॉलर्सपेक्षाही अधिक झाला. अर्थात त्यामुळं मनुष्यहानीही तितकीच झाली. जपानही डगमगला नाही. हिरोशिमा आणि नागासाकी शहरं पुन्हा उभी राहिली. पण लोकांच्या मनातून त्या भयंकर आठवणी पुसल्या गेल्या असतील का?

सबस्क्राईब करा

* indicates required