मुंग्यांचं वारूळ आतून किती भन्नाट असतं माहित आहे?

आज आम्ही तुमच्यासाठी एक एज्युकेशनल व्हिडीओ घेऊन आलो आहोत. लोकांना फार प्रश्न पडतात बुवा आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला ते लोक काहीही करतात. तर आज आपण भेटणार आहोत फाउंड्री मध्ये काम करणाऱ्या एका फोरमन भाऊंना. त्यांना प्रश्न पडला मुंग्याचे वारूळ आतमधून कसं दिसतं?

मिस्टर फोरमन यांना मेटल कास्टिंग हा प्रकार चांगल्या प्रकारे येत असल्यामुळे त्यांनी हाच प्रकार वापरून प्रयोग करायचे ठरवले. त्यांनी उकळतं मेटल एका ओसाड झालेल्या म्हणजेच जिथं आता मुंग्या राहात नाहीत अशा वारुळात ओतलं. त्यानंतर त्याला थंड होऊ दिलं आणि मग स्वछ धुऊन काढलं. मग काय, एक क्लासिक आर्ट पीस तयार!!

तर निसर्ग चमत्कारिक आहेच, मुंगीसारख्या लहान जीवानं किती गुंतागुंतीचं स्ट्रक्चर आतून तयार केलं असावं यावर विश्वास बसणं अवघड आहे. पण आज आपल्या फोरमन भाऊंच्या व्हिडीओमुळे आपण मेटल कास्टिंग, वारूळ आणि हाऊ-टू-मेक आर्टपीस या तिन्ही गोष्टी शिकलो. तर पटापट बघा हा व्हिडीओ आणि करा आर्टपीस तयार.

 

सबस्क्राईब करा

* indicates required