सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूरचा भाऊ परश्या आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी?

सैराटच्या हिंदी रिमेकचे हक्क करण जोहरनं विकत घेतल्याचं आम्ही तुम्हाला संगितलं होतंच. तर आता या रिमेकच्या कास्टिंगच्या बातम्या पसरल्या आहेत. मिड-डे या इंग्रजी पेपरच्या रिपोर्टनुसार या चित्रपटासाठीची कास्टिंग जवळजवळ फायनल झाली आहे.

शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर हा परश्याचा भूमिकेत दिसणार आहे. ईशान तसा ऑलरेडी स्टार आहे. त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलला ३०,००० पेक्षा जास्त लोकांनी फॉलो केलंय. तर आर्चीच्या भूमिकेसाठी श्रीदेवी आणि बॉनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर हिच्या नावाची चर्चा आहे.

पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे करण जोहरच्या मताप्रमाणं सध्या हिंदी प्रेक्षकांना आवडण्यासाठी स्क्रिप्टमध्ये बदल करण्यात येत आहेत. कदाचित या नंतर येणाऱ्या चित्रपटाला सैराटचा रिमेक म्हणता येईल का नाही हे काळच ठरवेल. तोवर आपण जान्हवी कपूर, "हिंदी नै आती? तो क्या इंग्लिशमें समझाऊँ क्या??" कसं म्हणेल याची कल्पना करूया..

सबस्क्राईब करा

* indicates required