या कारणांमुळं इसिसचे अतिरेकी बायकांना घाबरतात!!

अतिरेक्यांना सगळं जग घाबरतं. इसिसच्या अतिरेक्यांना तर घाबरतंच घाबरतं. पण हेच इसिसचे अतिरेकी  स्त्रियांच्या पलटणीला घाबरतात असं म्हटलं तर?

पटण्यासारखी गोष्ट नसली तरी हे खरंय. त्यांना भीती आहे स्त्रियांकडून मारलं जाण्याची. त्यामुळं कुर्द लोकांच्या सुरक्षादलातल्या बायकांचा इसिसने धसका घेतलाय. सी. एन. एन.च्या बेन वेडमन (Ben Wedeman)ने कुर्दच्या ऑल-वुमेन टीमशी संपर्क साधला. या टीमचं म्हणणं असं होतं की, अतिरेक्यांचे लीडर्स इस्लामच्या नावावर इतरांचं ब्रेन वॉशिंग करून त्यांना अतिरेकी बनवतात. त्यात ’आपल्या ध्येयासाठी शहीद झाल्यास स्वर्ग मिळेल’ हे गाजर तर नेहमीच असतं.  त्यामुळं जर बायकांच्या हातून मरण आलं तर त्यांना स्वर्ग मिळणार नाही अशी या अतिरेक्यांची समजूत आहे. 

या ’ऑल वुमेन फायटर’ दलात सुमारे ७००० महिला आहेत. सिरियाच्या ’कोबानी’ आणि ’अल-हल’ या दोन शहरांवर इसिसचं वर्चस्व होतं. या गटानं इसिसच्या अतिरेक्यांना  सिरियाच्या  या दोन्ही शहरांतून पळवून लावण्यात यश मिळवलंय.  "जर त्यांनी आमच्यावर हल्ला केला, तर आम्ही त्यांना जिवंत सोडणार नाही" असं या फायटर माहिलांचं म्हणणं आहे. 

दहशतवादाशी सामना सगळ्यांचा आहे आणि या फायटर माहिला त्यांचा यातला वाटा उचलत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना टीम बोभाटाचा सलाम!! 

सबस्क्राईब करा

* indicates required