हुर्रे... भारत पुन्हा एकदा कबड्डी वर्ल्ड चॅम्पियन!!

भारताने आज पुन्हा एकदा कबड्डी वर्ल्ड कप जिंकला. फायनलमध्ये आज भारताने इराणचा ३८ विरूद्ध २९ गुणांनी पराभव केला आणि कबड्डीमधलं आपलं वर्चस्व कायम राखलं.

पहिल्या हाफमध्ये इराणच्या डिफेन्सनं भारताला चांगलंच रोखून धरलं होतं पण अनूपकुमारच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने दुसऱ्या हाफमध्ये चांगलीच बाजी पालटली. अजय ठाकूर या भारताच्या रेडरने "सुपर 10" म्हणजेच 10 रेड पॉईंट्स (Raid Points) मिळवले. या स्पर्धेत त्यानM पाचव्यांदा हा पराक्रम केला आहे.

प्रो-कबड्डी लीग मुळं पुन्हा एकदा लोकप्रियता मिळवत असलेली कबड्डी भारताच्या विजयामुळे अजूनच पॉप्युलर होणार. प्रो-कबड्डीच्या अनुभवाचा फक्त भारतीय टीमलाच नाही, तर इराणी टीमला पण फायदा झाला. मेराज शेख व फाजल अत्राचली या खेळाडूंनी भारताच्या टीमला  आज चांगलंच सतावलं.

कबड्डी हा खेळ 2020 च्या ऑलम्पिकमध्ये पण समावेश करण्याची मागणी आहे. कदाचित यामुळं भारताला गोल्ड मेडल मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

सबस्क्राईब करा

* indicates required