या भारतीयाने पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी जे केलंय ते पाहून छाती अभिमानाने फुलून येईल !!

दुबईत एक भारतीय माणूस देवदूत ठरला आहे. पाकिस्तान, बांगलादेश, उगांडा, अफगाणिस्तान, नायजेरिया, चीन आणि इथिओपिया या देशांमधील एकूण 13 कैद्यांसाठी त्याने विमानाचं तिकीट बुक केलं आहे.
या भारतीयाचं नाव आहे जोगिंदर सिंग सलारिया. वरती दिलेल्या देशांमधील कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली आहे, पण त्यांच्याकडे घरी परतायला पैसे नव्हते. त्यांच्या मदतीसाठी जोगीदार धावून आला आहे.
जोगिंदरने दुबईत ‘पेहल चॅरिटेबल ट्रस्ट’ची (पीसीटी) स्थापना केली आहे. या संस्थेच्या अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. दुबईचे पोलीस देखील पीसीटी सोबत जोडलेले आहेत. पोलिसांनीच या 13 कैद्यांची यादी संस्थेकडे पाठवली होती.
या कैद्यांना अगदी किरकोळ गुन्ह्यांसाठी कैदेत टाकण्यात आलं होतं. यातील बऱ्याचजणांना ठरलेल्या काळापेक्षा जास्त राहिल्याबद्दल शिक्षा झाली होती. काहींना तर त्यांच्या मालकासोबत झालेल्या भांडणामुळे शिक्षा झाली होती. हे सर्वचजण गरीब घरातले आहेत.
जोगिंदर सध्या पोलिसांच्या मदतीने या 13 जणांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करतोय. या गोष्टीसाठी त्याचं कौतुक होत आहे. त्याने यापूर्वी पण अशा सामाजिक कामात आपल्या संस्थेकडून हातभार लावला होता.
मंडळी, काही महिन्यांपूर्वीच आग्राच्या मोतीलाल यादव नावाच्या उद्योगपतीने १७ कैद्यांच्या वतीने बेलची रक्कम भरली होती. याविषयी आमच्या खालील लेखात सविस्तर वाचा.
या व्यापाऱ्याने वाढदिवसानिमित्त कैद्यांना दिली आगळीवेगळी भेट....