computer

व्हिडीओ ऑफ दि डे : मृत्युच्या दारात असताना त्याने आईला जे सांगितलं ते ऐकून अंगावर काटा येईल !!

मंडळी, दूरदर्शनच्या एका कॅमेरामनचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा या नक्षली भागात निवडणुकीचं कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या मिडीयाच्या टीमवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आपला मृत्यू अटळ आहे हे दिसल्यावर मोरमुकुट शर्मा या कॅमेरामनने आपल्या आईसाठी व्हिडीओ मार्फत संदेश तयार केला होता. हा संदेश मन हेलावून टाकणारा आहे. 
 

"आम्ही दंतेवाडा मध्ये निवडणुकीच्या कव्हरेजसाठी आलो होतो. आमच्या सोबत आर्मी होती. आम्ही एका भागातून जात असताना आम्हाला नक्षलवाद्यांनी घेरलं.” असं म्हणत त्याने पुढे आईला उद्देशून म्हटलं, “आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कदाचित मी या हल्ल्यात जिवंत राहणार नाही. पण माहित नाही का, मृत्यू समोर असतानाही मला भीती वाटत नाहीये !!”
मंडळी, ही घटना घडली ३० ऑक्टोबर रोजी. नक्षलवाद्यांनी पोलीस आणि मिडीयाला घेरून चारी बाजूने हल्ला केला होता. २ पोलीस आणि एका कॅमेरामनचा यात मृत्यू झाला. सुदैवाने मोरमुकुट शर्मा सुखरूप वाचले आहेत.

मंडळीं, मागे चाललेला गोळीबाराचा आवाज तिथल्या अंगावर काटा आणणाऱ्या वातावरणाची कल्पना देण्यासाठी पुरेसा आहे. अशा परिस्थतीतही ‘भीती वाटत नाहीये’ म्हणणाऱ्या मोरमुकुट शर्माचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required