आता चक्क विमानाच्या पंखांवर बसून जेवणाचा आस्वाद घ्या...दिल्लीतलं हे अनोखं हॉटेल पाह्यला का ??

मंडळी, जगभरात वेगवेगळ्या पद्धतीचे हॉटेल्स पाहायला मिळतात. जगभराचं जाऊद्या राव, आपल्या जयपूर मध्ये पब्जी हॉटेल सुरु झालंय माहित असेलच तुम्हाला. असंच आणखी एक अतरंगी हॉटेल दिल्ली मध्ये सुरु झालंय. हे हॉटेल चक्क विमानात आहे !! नाही समजलं ? हा फोटो बघा !!

स्रोत

बघितलं का ? आजवर विमानात जेवण मिळायचं पण इथे तर विमानाचं चक्क हॉटेल मध्ये रुपांतर झालंय राव. दिल्लीतल्या रोहिणी मेट्रो वॉक येथे रनवे १ नावाचं हॉटेल सुरु झालं आहे. हे हॉटेल म्हणजे बंद पडलेलं एअरबस A320 विमान आहे. या विमानाच्या आतील व बाहेरील बाजूला सुंदरशा हॉटेलचं रूप देण्यात आलं आहे. ही कल्पना लुधियानाच्या एका बाप-बेट्याच्या जोडीला सुचली आहे. त्यांनी रिकाम्या विमानाचा अशा अनोख्या पद्धतीने वापर करून घेतला.  

स्रोत

मंडळी, ‘रनवे १’ च्या चारी बाजूला पाणी आहे, शिवाय आजूबाजूला भरपूर झाडी आणि हिरवळ आहे. अशा सुंदर वातावरणात ग्राहक चक्क विमानाच्या पंखांवर बसून जेवणाचा आनंद लुटू शकतात. याखेरीज विमानाच्या आत १०० माणसांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. लहानमुलांसाठी 3D गेम्स पण आहेत.

‘रनवे १’ हे भारतातील या प्रकारचं दुसरं हॉटेल आहे. यापूर्वी अशीच कल्पना लुधियानाच्या आणखी एका व्यक्तीने शोधून काढली होती.

चला तर आता पाहूया ‘रनवे १’ची आतील दृश्य :

स्रोत

स्रोत

स्रोत

स्रोत

तुम्ही जर नेहमीच्या चार भिंतीमधल्या हॉटेलला कंटाळला असाल तर ‘रनवे १’ तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. मग कधी जाताय दिल्लीला ??

सबस्क्राईब करा

* indicates required