PUBG फॅन्ससाठी खुशखबर, या पेश्शल हॉटेलमध्ये कधी जाणार ?

१ युद्धभूमी, १०० शस्त्रसज्ज सैनिक आणि शेवटी फक्त १ जिवंत राहणार. या युद्धभूमीवर जिवंत राहण्यासाठी प्रत्येकालाच प्राणपणाने लढावं लागतं. जो शेवटपर्यंत टिकून राहतो त्यालाच “चिकन डिनर” मिळतं. मंडळी एव्हाना तुम्हाला समजलं असेलच की आम्ही PUBG बद्दल बोलतोय. राव, तुम्ही जर PUBG चे डायहार्ड फॅन असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.

स्रोत

तर, खुशखबर अशी आहे की जयपूर मध्ये एक नवीन हॉटेल उघडले आहे. हे हॉटेल संपूर्णपणे PUBG च्या थीमवर तयार करण्यात आलंय राव. म्हणजे आता चिकन डिनरसाठी तुम्हाला जीवाची बाजी लावण्याची गरज नाही. 

स्रोत

हिरवीगार जमीन, मिलिटरी पद्धतीची बैठक, PUBG स्टाईलने रंगवलेल्या भिंती, इथे ‘सबकुछ PUBG’ असा मामला आहे राव. फक्त एक फरक आहे. PUBG चा अर्थ होतो PlayerUnknown’s BattleGrounds. पण या रेस्टॉरंटच्या नावामध्ये थोडा फरक आहे - Player Unknowns 'Belly' Grounds !!

स्रोत

तर मंडळी, जयपूर मध्ये गेलात तर या हॉटेलला नक्की भेट द्या. आणि हो आता विचारू नका इथे जायला पॅराशूट कुठून मिळेल !!

सबस्क्राईब करा

* indicates required