कर्नाटकमधले विद्यार्थी डोक्यावर बॉक्स ठेवून परीक्षा का देत आहेत ?

काही दिवसांपूर्वी आम्ही एक लेख बोभाटावर प्रकाशित केला होता. मेक्सिकोतल्या शिक्षकांने कॉपी रोखण्यासाठी कसा विचित्र फंडा वापरला होता ते आम्ही सांगितले होते. त्या शिक्षकाने चक्क मुलांच्या डोक्यावर फुट्टे घातले होते. फक्त समोरचे दिसेल एवढीच जागा शिल्लक ठेवली होती. आता हीच आयडीया भारतात पण लोक वापरायला लागले आहेत राव!!
कर्नाटकमधील हवेरी येथील भगत प्रि युनिव्हर्सिटीत हा प्रकार घडला आहे. बीएस्सीच्या पहिल्या वर्षाचा केमिस्ट्रीचा पेपरमध्ये कॉपी होऊ नये म्हणून तिथल्या शिक्षकांनी ही भन्नाट आयडीया वापरली. तिथल्याच एका शिक्षकाने तो फोटो सोशल मीडियावर टाकला तेव्हा इतरांना ही गोष्ट समजली.
सोशल मीडियावर हा फोटो टाकणारे ते शिक्षक बोलले की हा निर्णय विध्यार्थ्यांशी बोलूनच घेतला आहे. पण आपला भारत काय विदेशाएवढा सरळ नाही राव!! त्या युनिव्हर्सिटी विरुद्ध आता नोटीस निघाली आहे. तिथल्या बोर्डच्या सदस्याने सांगितले की अशा पद्धतीने कॉपी रोखणे चुकीचे आहे. कॉपी रोखण्यासाठी अनेक पर्याय असताना विद्यार्थ्यांना त्रास होईल असा पर्याय निवडणे चुकीचे आहे.
एका विद्यार्थ्याने सांगितले की हे आमच्या मर्जीविरुद्ध झाले आहे. मंडळी ही आयडीया चांगली की वाईट हे तुम्हीच ठरवा पण आता या सगळ्यात वादात ही आयडीया मात्र मागे पडणार हे निश्चित.
लेखक : वैभव पाटील