computer

पृथ्वीवरच्या नंदनवनाची सफर करायची असेल तर लवकरच जाऊन या काश्मीरला ! पुढच्या महिन्यात हिमवर्षाव सुरू होईल !

काश्मीर म्हणजे भारताचा स्वर्गच! तिथले निसर्ग सौंदर्य पाहणे म्हणजे डोळ्यांना एक सुखद अनुभव असतो. आयुष्यात एकदा तरी या स्वर्गात जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेणे ही सर्वांची इच्छा असते. पण काश्मीरला नक्की जायचे कधी? तिथे बदलणारे ऋतू, हवामान, पडणारा बर्फ यामुळे चांगले दिवस कोणते? तुम्हीही हा विचार करत असाल तर सध्या, म्हणजे शरद ऋतूत तिथे जायचा जरूर विचार करा. सध्या तिथे हा ऋतू चालला आहे. तुमचा विश्वास बसत नसेल तर तिथले काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे पाहून तुम्हाला असे वाटेल की हे स्वित्झर्लंड किंवा अमेरिकेतील फोटो आहेत. पण हे खरेतर हे आपल्या काश्मीरमधले आहेत.

दरवर्षी काश्मीर खोऱ्यात शरद ऋतूमुळे सर्व बागा खूप सुंदर रूप धारण करतात. या ऋतूला तिथले स्थानिक लोक 'हरूड' असेही म्हणतात. या ऋतूत भव्य चिनार झाडांची मॅपलची हिरवी पाने सोनेरी तपकिरी होतात. हा बदल निसर्गप्रेमींना नेहमीच आकर्षित करतो.

इथे अनेक बागा पर्यटकांसाठी खुल्या असतात. प्रसिद्ध मुघल गार्डन्स तर पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते.इथे चिनार वृक्षांच्या सोनेरी पानांच्या रंगामुळे आणि पानगळतीमुळे जे नयनरम्य वातावरण तयार होते, ते पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने उद्यानांमध्ये गर्दी करतात.जगभरातील पर्यटक मुघल गार्डन्स व्यतिरिक्त निशात, शालिमार आणि हरवान गार्डन्सला भेट देतात आहेत.हा ऋतू वेगवेगळ्या रंगछटांचा असतो.

काश्मीरमध्ये सामान्यतः चार ऋतू असतात. शरद ऋतू हा खूप सुंदर ऋतू मानला जातो. काश्मीर खोऱ्यात २३ सप्टेंबरला शरद ऋतू सुरू होतो. त्यानंतर कडाक्याची थंडी सुरू होते आणि बर्फ वर्षाव सुरू होतो. त्यामुळे सगळीकडे झाडांवर बर्फाची पांढरी चादर पसरली जाते. तिथे दळणवळण अवघड होऊन जातं. त्यामुळे शरद ऋतूत तिथे एकदातरी भेट नक्कीच द्यायला हवी.

हे फोटो पाहून तुम्हाला काय वाटतं?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required