यांच्यातही माणसासारखीच संवेदना : यांचा जिव्हाळा पाहून तुम्हालाही गलबलून येईल...

Subscribe to Bobhata

  आपण पाहतो की मुक्या जनावरांच्या मनातही एकमेकांप्रती प्रेम, आपुलकी, द्वेष, राग अशा विविध भावना नांदत असतात; अगदी  तुमच्याआमच्यासारख्याच! कदाचित त्या आपल्यापेक्षाही तीव्र असतात. आता या वानरांचंच उदाहरण घ्या ना... 

 बीबीसीकडून एक आगळीवेगळी डॉक्युमेंटरी सिरीज चालवली जाते. तिचं नाव आहे "स्पाय इन दी वाईल्ड." यामध्ये कॅमेरा बसवलेली प्राण्यांची हुबेहुब प्रतिकृती प्राण्यांसोबत ठेवून त्यांचे नैसर्गिक हावभाव टिपले जातात.   राजस्थानातल्या या वानरांच्या टोळीतसुद्धा असाच एक वानराच्या पिलासारखा दिसणारा रोबोट ठेवण्यात आला.

खोट्या माकडात बसवलेला कॅमेरा 

      या वानरांनीही त्याला आपल्यातलाच एक समजून जवळ घेतलं. पण जेंव्हा हे पिलू कोणतीच हालचाल करत नाही हे त्यांना जाणवलं, तेव्हा मात्र त्याला मृत समजून ते शोक करू लागतात, त्याला जागं करण्याचा प्रयत्न करतात. आणि अक्षरशः एकमेकाच्या गळ्यात पडून एकमेकाचं सांत्वनही करताना ते दिसतात!  त्या पिलाचं निष्प्राण शरिर बघून त्यांच्या चेहर्‍यावर दिसणारी अस्वस्थता आपल्यालाही काही क्षण हळवं करून जाते. 

आजच्या स्वार्थी युगात माणूस आपली नाती विसरताना दिसतोय. कदाचित हे वानर आपल्याला "आम्हाला अजूनही संवेदना आहेत, तुम्हाला आहेत का ?" असंतरी विचारत नसतील ना ??

सबस्क्राईब करा

* indicates required