आता बनणार लो-फॅट चॉकलेट्स…!

जगातला सर्वात जास्त खाल्ला जाणारा आणि सर्वांचा आवडता पदार्थ कोणता म्हणून विचारलं तर पटकन उत्तर "चॉकलेट्स" हेच येईल.  

मात्र हे आवडणारं चॉकलेट खाल्ल्यानंतर मात्र अनेकांना गिल्टी वाटतं. याचं कारण चॉकलेटसध्ये असणारं फॅट! कोकोपासून कोणतंही चॉकलेट बनताना त्यात 40 ते 60 टक्के कोको बटर असणं गरजेचं असतं. इतक्या सार्‍या बटरमुळं  चॉकलेट योग्य प्रमाणात पातळ म्हणजे प्रवाही राहून त्याचे विविध प्रकार बनवणं सोपं होतं. कोको बटरचं प्रमाण याहून कमी केल्यास चॉकलेट कडक बनतं आणि परिणामी त्यापासून विविध प्रकार बनवताच येत नाहीत. त्यांची यंत्रंही  मग अशावेळेला चॉकलेट अडकून निकामी होतात.

स्त्रोत

या परिस्थितीवर शास्त्रज्ञांनी आता तोडगा काढला आहे. चॉकलेटचा प्रवाह ज्या दिशेने होणं अपेक्षित आहे, त्या दिशेने चॉकलेटच्या प्रवाहात वीजप्रवाह सोडला, तर कोकोचे कण एकमेकांना साखळीसारखे चिकटून त्यांना अपेक्षित गती देता येते. यामुळे कोको बटर कमी वापरूनही चॉकलेट क़डक  बनत नाहीतच, आणि मशीन्ससुद्धा निकामी होत नाहीत. त्यामुळं १०% लो-फॅट चॉकलेट असलेले विविध पदार्थ बनवता येणं सहज शक्य झालं आहे. तज्ज्ञांच्या मते, या तंत्राने बनलेलं चॉकलेटसुद्धा  तेवढंच चविष्ट बनतं.

पण सध्या हे तंत्र प्रायोगिक तत्त्वावर असल्यानं लो-फॅट चॉकलेट्साठी आणखी काही काळ  आपल्याला वाट पाहावी लागणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required