computer

विध्वंसातून कलानिर्मिती...या कलाकाराने चक्क स्फोटातल्या अवशेषांतून कलानिर्मिती केली आहे!!

'विध्वंसातून कला जन्म घेते,' हे वाक्य कुठेतरी वाचण्यात आले होते. या वाक्याची आठवण व्हावी अशी प्रेरणादायक गोष्ट लेबनॉन नावाच्या देशात घडली आहे.

तुम्हाला आठवत असेल, काही दिवसांपूर्वी लेबनॉन देशाच्या बैरुत शहरात मोठा स्फोट होऊन प्रचंड नुकसान झाले होते. अगदी काही सेकंदात हे शहर होत्याचे नव्हते झाले होते.

एका कलाकाराने मात्र या स्फोटात तुटलेले धातू, काचेचे पदार्थ, दगड यांना एकत्रित करत अफलातून अशी मूर्ती बनविली आहे. सध्या या मूर्तीबद्दल जगभरात चर्चा होत आहे. या मूर्तीत एक महिला हातात लेबनॉनचा झेंडा घेऊन उभी आहे. त्या महिलेचे केस आणि कपडे हवेत उडताना दिसत आहेत.

आयत नझीर असे ही मूर्ती तयार करणाऱ्या कलाकाराचे नाव आहे. ही मूर्ती तयार करून तिने हा फोटो इन्स्टाग्रामवर टाकल्याबरोबर जगभर आयतचे कौतुक होऊ लागले होते. 33 वर्षीय आयत लेबनॉनचीच रहिवासी आहे.

बैरुत शहराची साफसफाई होत असताना आयत  बघित होती. त्यावेळी तिच्या मनात विचार आला की, आपण यापासून देशाला एकसंध होण्यास प्रेरणा देईल अशी मूर्ती तयार करू शकतो. आयतने घरोघर जाऊन, लोकांच्या घरी तुटलेल्या, फुटलेल्या वस्तूंची मागणी केली. 

अशाप्रकारे ही जगप्रसिद्ध मूर्ती तयार झाली आहे. आयतने रात्रभर जागून ही 2.6 मीटरची मूर्ती तयार केली आहे. यासाठी तिला दोन महिने लागले. तिने या मूर्तीला नाव दिलेले नााही. मूर्तीचे नामकरण लोकांनी करावे अशी तिची इच्छा आहे.

 या मूर्तीचं वैशिष्टय म्हणजे या मूर्तीत स्फोट झाला ती 6.08 मिनिटे देखील दिसत आहेत. सध्या प्रसिद्ध झालेले वाक्य 'आपदा को अवसर मे बदले' याचा यापेक्षा चांगला परिचय काय असू शकेल, नाही का?

 

सबस्क्राईब करा

* indicates required