ही आहे जगातील सर्वात महागडी पेंटिंग - विकली गेली तब्बल एवढ्या मोठ्या किमतीला !!

‘लिओनार्दो दा विन्ची’ या महान चित्रकाराची एक अप्रतिम पेंटिंग नुकतीच लिलावात विकली गेली आणि ही पेंटिंग बनली आहे जगातील सर्वात महागडी विकली गेलेली पेंटिंग. ही पेंटिंग विकली गेली आहे ४५०.३ मिलियन डॉलर्स म्हणजेच तब्बल २६०० कोटी डॉलर्स मध्ये. लिओनार्दो दा विन्चीने काढलेल्या २० दुर्मिळ पेंटिंगपैकी ही एक पेंटिंग आहे. त्यामुळे याला भलतंच महत्व आहे मंडळी. न्यूयॉर्क मध्ये हा कार्यक्रम पार पडला.

 

काय आहे पेंटिंग ?


स्रोत

ही पेंटिंग आहे येशू ख्रिस्ताची. ख्रिस्ताला या पेंटिंग मध्ये ‘जगाचा तारणहार’ म्हणून दर्शवलं गेलंय. याला ‘सेवियर ऑफ दि वर्ल्ड’ किंवा ‘सॅल्वातोर मुंडी’ म्हणतात. २ फुट १७ इंच उंचीच्या या चित्रात ख्रिस्ताने ‘रेनेसां’ पद्धतीचे कपडे परिधान केलेले दिसत आहे. त्याचा एक हात आशिर्वादासाठी उठला आहे तर दुसऱ्या हातात ‘जादुई काचेचा गोळा’ आहे.

सर्वात आधी ही पेंटिंग इंग्लंडचा राजा ‘चार्ल्स पहिला’ याच्या मालकीची होती पण पुढच्याकाळात ती दिसेनाशी झाली. यानंतर १९०० साली ती पहिल्यांदा दिसली आणि मग अनेक लिलाव पार करून आता ही पेंटीग नवीन मालकाच्या स्वाधीन झाली आहे.

न्यूयॉर्क मधल्या या निलामित सर्वात जास्त चर्चेचा विषय होती लिओनार्दो दा विन्चीची ही पेंटिंग. खरं तर ही पेंटिंग विकली गेली आहे ४०० मिलियन डॉलर्स मध्ये पण त्याशिवाय काही रक्कम विकत घेणाऱ्याला लिलाव करणाऱ्या संस्थेला द्यावी लागली. म्हणजेच एकूण ४५०.३ मिलियन डॉलर्स. जेव्हा पेंटिंग विकली गेल्याचा शेवटचा हातोडा पडला तेव्हा एकच टाळ्यांचा कडकडाट झाला राव. हा लिलाव तुम्ही खाली बघू शकता.

सबस्क्राईब करा

* indicates required