सैराटच्या हिंदी रिमेकचा पोस्टर आलाय भाऊ...करण जोहरचा ‘ड्रामा प्रोडक्शन’ बनवणार सिनेमा !!

मंडळी, करण जोहर सैराट बनवणार म्हणून बातम्या पसरत होत्या. आता तो स्वतः बनवणार की अजून कोणी डायरेक्टर सैराटवर काम करणार की खुद्द नागराज मंजुळे हिंदी सैराटच्या निमित्ताने हिंदी मध्ये उतरणार ? असे अनेक प्रश्न होते. पण करण जोहरचं ‘धर्मा प्रोडक्शन’ यात गुंतलंय एवढं मात्र नक्की होतं. मंडळी काही दिवसापूर्वीच सैराटच्या हिंदी रिमेकचा पोस्टर लाँच झाला आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या. सैराटच्या हिंदी रूपाचं नाव आहे ‘धडक’. राव, आपण आधी पोस्टर बघूया...


स्रोत

तर, आर्ची आणि परशा हिंदी मध्ये कोण साकार करणार ? कोणता नवीन चेहरा असणार ? असे अनेक प्रश्न मनात होते पण....पण.... अरेच्चा इथे तर चक्क ‘श्रीदेवी’ ची पोरगी 'जान्हवी कपूर' आणि शहीदचा भाऊ ‘इशान खट्टर’ आर्ची आणि परशा बनून रायले ना भाऊ. कसं आहे ना नागराज मंजुळे साहेबांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती पण ‘यहा बात कुछ और है भाया !!’.

परशाचा शोध रेल्वे स्टेशनवर लागल्याचं मागे एकदा ऐकलं होतं पण हा करण जोहर आहे राव. हा इतका कष्ट घेत नसतो. त्याने सरळ ‘स्टार किड्स’ च्या भल्यामोठ्या यादीतून ज्यांना लाँच करायचं आहे अश्यांची नावे काढली आणि ‘अक्कड बक्कड बंबे बो’ करत त्यांच्यातील बेस्टम बेस्ट जोडीला ‘सिलेक्ट केलं. जोडी पण मिळाली आणि कष्ट पण वाचले...दे ताली !!!

'घराणेशाही' म्हणतात ना ती हीच !!


स्रोत

कलाकारांच्या बाबतीत जर असं असेल तर कथेच्या बाबतीत काय केलंय करण जोहरने ते देवच जाणे !! मंडळी करण जोहरच्या ‘धर्मा (ड्रामा) प्रोडक्शन मधून सैराट कोणत्या रुपात निघतोय ते भविष्यच सांगेल पण यावर तुम्हाला काय वाटतं ते मात्र आता लगेच सांगा बरं का !!