अशी गुंतवणूक करते LIC शेअर बाजारात !!!

LIC ने या शेअर वरती तीन वर्षात ३५०% नफा कमावला. लाईफ इन्शुरन्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया हि देशातील एक नंबरची विमा कंपनी तर आहेच आणि त्या सोबत अनेक कंपन्यांच्या शेअर मध्ये गेली कित्येक वर्ष गुंतवणूक करते आहे. LIC कडे असलेल्या विविध कंपन्यांच्या असलेल्या शेअर्सची किंमत आजच्या तारखेस १५ लाख कोटी आहे. या वर्षी काही शेअर्सची विक्री करुन LIC ने गेल्या वर्षी पेक्षा दुप्पट नफा कमावला आहे. त्यापैकी एक म्हणजे भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड. या कंपनीचे ५% शेअर्स गेली कित्येक वर्ष LIC कडे आहे. २००९ साली २९ रुपयाचा हा शेअर आज बाजारात १७४ रुपयाच्या पलीकडे आहे आणि तज्ञांच्या मते हा शेअर आताही घेण्यासारखा आहे. सोबत दिलेल्या आलेखावरून हे चित्र सुस्पष्ट होईल.

सबस्क्राईब करा

* indicates required