पोटातून काढलेल्या दगडाची गोष्ट !!!

वरच्या चित्रात दिसणारा दगड हा काही साधासुधा दगड नाही हो.. हा आहे धरमपूर, वलसाड येथे राहणाऱ्या महेश पटेल यांच्या पोटातून काढलेला मुतखडा !!!

यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.झालं असं की अचानक लघवी तुंबल्यामुळं महेश पटेल यांना वलसाडमधल्या साईनाथ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं. एक्स रे काढल्यानंतर समजलं की त्यांच्या पोटात प्रचंड मोठा मुतखडा आहे. डॉक्टर धीरूभाई पटेल यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून मुतखडा बाहेर काढला आणि त्या  मुतखड्याचं वजन १.४ किलोचं निघालं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आत्तापर्यंतचा भारतातला हा सर्वात मोठा मुतखडा आहे.

जगातला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा मुतखडा हा ब्राझीलमधल्या रुग्णाच्या पोटातून (१.९ किलोचा) काढण्यात आलाय. आता त्यानंतर महेश पटेल यांचा नंबर लागतो.  त्यामुळे हॉस्पिटल लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्सला बोलावणं घालणार असल्याचं म्हटलं जातंय.

सबस्क्राईब करा

* indicates required