व्हायरल व्हिडीओ: या लहान मुलाचा व्हिडीओ पाहून तुमचा दिवस नक्कीच छान जाईल
लष्कराबद्दल भारतात प्रचंड आदर आहे. भारताचे शेजारी देश आणि त्यांच्या कारवाया बघता त्या पार्श्वभूमीवर भारताच्या सीमा सुरक्षित ठेवणे हे मोठे दिव्य काम भारतीय लष्कर स्वतःच्या जीवावर उदार होऊन करत असते. देशात कोठेही आपत्ती ओढवली तर अशाही वेळी सर्वात आधी लष्कराला पाचारण केले जाते. लष्कर आल्यावर आता हे संकट दूर होईल याचा मोठा दिलासा अशावेळी मिळतो. या सर्व गोष्टींमुळे लष्कराशी निगडित प्रत्येक गोष्टीबद्दल देशवासियांना आदर आहे. लष्कराचे रणगाडे कुठे दिसले तरी उर भरून येतो. सैन्यातून सुटीवर येणारे जवान दिसले तरी त्यांच्याबद्दल आपल्याला आदरच वाटतो.
भारतीयांना असलेल्या हेच लष्करप्रेम किती भिनलेले आहे याचा प्रत्यय बंगलोर येथे घडलेल्या एका घटनेतून येऊ शकतो. एक लहानसे पोरगं आपल्याला पालकसोबत रस्त्यावरून जात असताना त्याला आर्मी टॅंक दिसला. हा टॅंक दिसल्यावर या पोराने काय करावे?
या मुलाने त्या गाडीत बसलेल्या जवानाला थेट एक कडक सॅल्युट ठोकला. हा सॅल्युट बघून त्या मुलाला परत सॅल्युट केले. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर वायरल होत असून या पोराच्या या क्युट कृत्याचे चौफेर कौतुक होत आहे.
अनेकांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने भारताचे भविष्य सुंदर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर एकाने त्या जवानाच्या जागी स्वतःला ठेऊन बघितल्यास किती अभिमान वाटेल, असे म्हटले आहे. एकंदरीत भावाने लोकांचा दिल जिंकलं आहे.
उदय पाटील




