मंडळी मार्केट मध्ये जे जे प्रसिद्ध आहे आणि महाग आहे, ते प्रत्येकालाच परवडेल असं नाही. ह्याच गरजेपोटी आपले शेजारचे ‘चायनावाले’ हुबेहूब माल बनवतात. काही जळके लोक याला ‘डुप्लीकेट’ म्हणतात ती वेगळी गोष्ट. पण राव, फक्त यांनाच गरीबातल्या गरीब माणसांची काळजी आहे बाकी कुण्णालाच नाही!! म्हणून तर मार्केट मध्ये ‘मेड इन चायना’ माल एवढा पसरलाय भाऊ. आता आपल्याकडे दिवाळी येत आहे ना? तर थोड्याच दिवसात मार्केटमध्ये "मेड इन चायना" दिसू लागेल....असो...
मंडळी आज आपण बघणार आहोत काही ‘चायनीज प्रोडक्ट’ जे हुबेहूब अस्सल ब्रँड्स वरून चोरले गेले आहेत.
यातील किती प्रोडक्ट तुम्ही बघितलेत? चला एकदा नजर टाकू....

१. PUMA
प्युमाचा 'वाघ' काढून 'मासा' लावला. बस्स एवढाच फरक!!

२. McDonald's

३. Adidas
चले तो चांद तक नही तो रात तक!!

४. PlayStation
स्वस्त आणि मस्त!!

५. Gillette
सटासट!!!

६. KFC
KFC चं जाऊद्या ओ... पण आपले 'ओबामा' तात्या तिथे काय करतायत??

७. Olay
डिट्टो!!

८. Windows
त्यांना 'बिंडोज' म्हणायचं आहे की 'बिंडोक'?

९. Google
निदान गूगलला तरी सोडायचं !!

१०. Nokia
नोकला की ढोकला?






