व्हिडीओ ऑफ दि डे : वाघाने हल्ला केल्यावर त्याने काय केलं पाहा....

वाघाच्या जबड्यातूनही जिवंत परतता येतं, फक्त अशावेळी डोकं काम करत असलं पाहिजे. भंडारा जिल्ह्यातील ही घटना पाहा. या घटनेत एका व्यक्तीवर वाघाने हल्ला  केला. त्याने वाघासमोर असं काही नाटक केलं की त्याला साधी जखमही झाली नाही.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील ही घटना आहे. या भागात वाघ आला होता. लोक जीव वाचवण्यासाठी धावत होते. तेवढ्यात वाघाने एका माणसावर हल्ला केला. या अज्ञात व्यक्तीने पळून न जाता जमिनीवरच झोपून राहिला. वाघाने त्याला मृत समजून त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. हे होत असताना इतर लोकांनी वाघाला पळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आणि थोड्याच वेळात वाघ पळाला. हा व्हिडीओ पाहा.

आयएफएस ऑफिसर प्रवीण कुस्वान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या ट्विट नंतर एका ट्विटर युझरने या घटनेचा पूर्ण व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला त्या माणसाच्या हिमतीला दाद द्यावीशी वाटेल..

कसा वाटला हा व्हिडीओ? कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required