व्हिडीओ ऑफ दि डे : महिलेचा जीव वाचवण्यासाठी या लोकांनी काय केलं पाहा !!

एका महिलेला वाचवण्यासाठी न्यूयॉर्कच्या लोकांनी जे केलं त्यासाठी त्यांचं जगभर कौतुक होत आहे. व्हिडीओ मागची गोष्ट वाचण्यापूर्वी व्हिडीओ पाहून घ्या.

तर, वेरोनिका ही न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरून किराणामालाचं सामान घेऊन चालत होती. इतक्यात एका कारने तिला मागून धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की ती कार खाली दाबली गेली. तिचे पाय टायरमध्ये अडकल्याने तिला बाहेर येता येईना. या घटनेनंतर तिथे उपस्थिती सगळे लोक तिला वाचवण्यासाठी  पुढे धावले. तिला बाहेर काढणं जमत नसल्याचं बघून सगळ्यांनी मिळून चक्क कार उचलली.

यानंतर तिथे पोलीस आले आणि त्यांनी कार चालकाला ताब्यात घेतलं. वेरोनिकाला जखमा झाल्या आहेत, पण गंभीर दुखापत झालेली नाही. तिच्या मदतीसाठी धावलेल्या प्रत्येकाचे तिने आभार मानलेत.

हा व्हिडीओ आतापर्यंत ५० लाख लोकांनी पाहिला आहे, तर २,१०,००० पेक्षा जास्त लोकांनी तो लाईक केला आहे. ओळख नसूनही तत्परतेने मदतीसाठी पुढे सरसावलेल्या त्या सगळ्यांचं जगभरातून कौतुक होत आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ?

सबस्क्राईब करा

* indicates required