हुंड्यात अख्खी ट्रेन मिळत होती, पण त्याने नको म्हटलं....त्याने दिलेलं कारण पटतंय का पाहा !!

रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही तर इतके गंमतीदार असतात की हसून हसून पोट दुखतं. बरं ही लोकं काही सेलिब्रिटी असतात असं नाही. सर्वसामान्य, साधी माणसं. अश्याच एका पठ्ठ्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. त्याने केलेला दावा ऐकून डोकं गरगरेल. 'अपुनही भगवान है' म्हणताना जेवढा त्या हिरोला कॉन्फिडन्स होता तेवढ्याच विश्वासाने हाही काही सांगतोय. याचं म्हणणं ऐकून सगळीकडे त्याच्या मिम्सही फिरताना दिसतायेत. एकदा व्हीडीओ बघूनच घ्या.

या व्हिडीओच्या सुरुवातीला कोणीतरी त्याला विचारले, "तुला म्हणे लग्नात सासरच्याकडून हुंडा म्हणून रेल्वे मिळाली होती, हे खरं आहे का?" यावर तो अगदी विश्वासाने म्हणतो, "हो, हे खरंय, अख्खी रेल्वे मिळाली होती, पण एवढी मोठी गाडी मी गावात पार्क करणार कुठे? म्हणून मी नको म्हणालो. छोटी गाडी असती तर चालवता आली असती, एवढी मोठी गाडी चालवणार कशी? त्यामुळे मी नाही म्हणालो."

याचं ऐकून एखाद्यानं कपाळावर हात मारून डोकं बडवून घ्यावं किंवा हसून सोडून द्यावं, एवढंच खरं. तसं पाहता हे पहिल्यांदाच घडत नाहीय. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओतील माणसाच्या म्हणण्याप्रमाणे उन्हात उभं राहून कोरोनावर मात करता येते. त्याने काय म्हटलं हे तुम्हीच पाहा !! 

 

लेखिका: शीतल दरंदळे

 

 

आणखी वाचा:

आणि हा इंदौरचा तरूण झाला इजिप्तजवळच्या प्रदेशाचा राजा!! जाणून घ्या हे कसं काय घडलं..

सबस्क्राईब करा

* indicates required