computer

#MeToo चळवळीने उजळून निघाला भारत.....काय आहे गुगलचा स्पेशल रिपोर्ट ?

मंडळी, एका क्लिकवर, एकाच जागी सगळी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी गुगल प्रसिद्ध आहे. आता नवीन उदाहरण बघा ना. गुगलने गुगल ट्रेंड मधून #MeToo चळवळीचा सर्व लेखाजोखाच सादर केला आहे. जगभरात कोणकोणत्या भागात #MeToo चळवळ पोहोचली आहे हे एकाच जागी आपल्याला समजतं. भारताबद्दल एक खुशखबर आहे राव. भारत #MeToo चळवळीत संपूर्ण जगात अव्वल क्रमांकावर पोहोचतोय. 

चला तर आज जाणून घेऊया गुगल ट्रेंड नुसार #MeToo चळवळीचा भारतावर किती खोल परिणाम झाला आहे ते !!

मंडळी, भारतात #MeToo चळवळीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या चळवळीचा भारतात किती प्रमाणात प्रचार प्रसार झाला, याबद्दल ‘गुगल ट्रेंड’ ने दिलेल्या माहितीनुसार, भारत चौथ्या क्रमांकावर आहे. #MeToo चळवळीत जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत हा सर्वात जास्त ‘सक्रीय’ देश मानला जातोय.

काय आहे Me Too Rising ?

मंडळी, एप्रिल महिना हा ‘लैंगिक अत्याचार जागरूकता महिना’ म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने गुगलने #MeToo चळवळीसाठी गुगल ट्रेंड अंतर्गत Me Too Rising हा वेगळा विभाग तयार केला होता. या विभागात #MeToo बद्दल व्हिज्युअल्सच्या माध्यमातून माहिती दिली जाते. 

Me Too Rising विभागात गेल्यावर आपल्याला पृथ्वी दिसते. जगातल्या ज्या भागात #MeToo चळवळ जोर धरत आहे त्या भागावर पांढरे ठिपके दिसतात. भारताचा नकाशा बघितला तर संपूर्ण भारत या पांढऱ्या ठिपक्यांनी उजळून निघाला आहे राव.

Me Too Rising ची एक खासियत अशी की जगभरात सर्वात जास्त ‘सर्च’ केल्या जाणाऱ्या ५ शहरांची नावे आपल्याला समजतात. ही पाचही शहरं भारतातली असून आश्चर्य म्हणजे यात मोठ्या शहरांचा समावेश नाही. याउलट छोट्या शहरांची नावे अव्वल क्रमांकावर आहेत. हा लेख लिहित असताना टॉपवर असलेली शहरं खालील प्रमाणे.

१. चिखली, गोवा
२. ब्रम्हपुर, बिहार
३. अंगुल, ओडीसा
४. ज़िरकपुर, पंजाब
५. वर्धा, महाराष्ट्र

भारताच्या कानाकोपऱ्यात #MeToo पोहोचत आहे हे यातूनच सिद्ध होतं.

मंडळी, #MeToo चळवळीने लैंगिक अत्याचाराविरुद्ध वाचा फोडली त्याचा किती खोलवर परिणाम झाला हे Me Too Rising च्या माध्यमातून आपल्याला समजतं. ज्या महिला अजूनही आपल्यावरील अत्याचाराबद्दल बोलण्यास कचरत आहेत त्यांना या माहितीमुळे नक्कीच बळ मिळेल.

 

आणखी वाचा : 

शनिवार स्पेशल : #MeToo चळवळ आहे तरी काय आणि याची सुरुवात झाली तरी कशी ?

सबस्क्राईब करा

* indicates required