माकडांनी चक्क कोरोनाचे ब्लड सॅम्पल पळवले ? व्हिडीओ पाहा !!

उत्तर भारतात वानरांची किती दहशत आहे हे तिकडे जाऊन आलेल्यांना चांगले माहीत असेल. अनेक धार्मिक स्थळांवर त्यांनी उच्छाद मांडलेला असतो. मध्यंतरी एका लहान मुलाला उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतानाचा सुद्धा वानरांचा व्हिडिओ वायरल झाला होता.

स्रोत

यावेळी पण वानरांच्या अशाच एका कृत्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे. मेरठच्या मेडिकल कॉलेजमध्ये एक लॅब टेक्निशियन काही ब्लड सॅम्पल घेऊन चालला होता. तेवढ्यात काही वानरांनी त्याच्याकडील ब्लड सॅम्पल हिसकावून घेतले आणि ते झाडावर चढले. कॉलेजच्या प्रमुखांच्या म्हणण्यानुसार ते सॅम्पल कोरोना रुग्णांचे टेस्ट सॅम्पल होते. 

 घटनेनंतर वानरांना पकडण्याचा खूप प्रयत्न झाला पण त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी पुन्हा एकदा रुग्णांचे ब्लड सॅम्पल घ्यावे लागले. पण आता मात्र आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या ब्लड सॅम्पलच्या माध्यमातून कोरोना झाला तर काय? हा प्रश्न लोकांना सतावत आहे. 

स्रोत

या विषयावर मात्र त्याच कॉलेजचे प्राचार्य म्हणतात की हे कोरोना बाधितांचे नेहमीच्या चेकअपचे सॅम्पल होते. त्यांनी असे म्हटले आहे की कोरोना टेस्टचे सॅम्पल थंड बॉक्समध्ये घेऊन जाण्यात येते तर हे सॅम्पल जनरल बॉक्समध्ये घेऊन जाण्यात येत होते.

आता खरंखोटं त्यांनाच माहित, पण तोपर्यंत पब्लिक जाम टरकली आहे हे खरं!!

सबस्क्राईब करा

* indicates required