मुंबई पोलिसांनी अतिरेकी समजून सिनेमातल्या कलाकारांना पकडलं ? बातमी मागचं सत्य काय आहे ??

मंडळी, काही दिवसापासून मुंबई पोलिसांची एक बातमी फिरत आहे. मुंबई पोलिसांनी म्हणे २ अतिरेक्यांना पकडलं, पण ते चक्क सिनेमातले कलाकार निघाले. राव,  या बातमीने सोशल मिडीयावर चांगलाच हशा पिकलाय. लोकांना काय, तेवढंच खाद्य मिळालं.

या बातमीला मुंबई पोलिसांनी एका वाक्यात हाणून पाडलं आहे. मुंबई पोलिसांचा हा ट्विट पाहा.

मुंबई पोलिसांनी म्हटलंय की ‘आम्ही अशा कोणत्याही माणसांना पकडलेलं नाही, एकदा बातमी तपासून घ्या.’

मंडळी, ही घटना थोडक्यात समजून घेऊया.

‘Tv9 Gujarati’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार मुंबई पोलिसांना एका बँकेच्या वॉचमनने आणि निवृत्त सेनाधिकाऱ्याने परिसरात अतिरेकी फिरत असल्याची माहिती दिली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी कसून तपास घेतला. तासाभराने त्यांच्या हाती दोघेजण लागले, पण आश्चर्य म्हणजे हे दोघेही सिनेमात काम करणारे कलाकार होते. सिनेमाच्या शुटींगसाठी त्यांनी अतिरेक्यांचा गेटअप केला होता. हा सिनेमा दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून ह्रितिक रोशन आणि टायगर श्रॉफचा आहे.

असं समजतं आहे की दोन शॉट्सच्या दरम्यान मेकअप आणि कपडे न बदलता हे दोघे एटीएममध्ये आणि इतर काही किरकोळ कामासाठी तसेच बाहेर पडले आणि लोकांना वाटले की खरोखरीचे अतिरेकी परिसरात फिरत आहेत. त्या दोघांच्या खरेपणाची खात्री पटल्यावर गेटअपमध्ये न फिरण्यासाठी कान पिचक्याही मिळाल्याच्या बातम्या आहेत.

मंडळी, मुंबई पोलिसांनी या बातमीवर प्रतिक्रिया देऊन आपली बाजू मांडली आहे, पण लोकं विभागली गेली आहेत. कोणी म्हणतंय मुंबई पोलीस खरं बोलतायत तर कोणी म्हणतंय मुंबई पोलीस खोटं बोलत आहेत.

बोभाटा पब्लिक,  तुम्हाला काय वाटतं ?

सबस्क्राईब करा

* indicates required