computer

उलटलेल्या गाडीला जागेवर आणण्यासाठी मुंबईकर एकवटले... शेवटी काय झालं पाहा!!

मुंबई स्वप्नांची नगरी म्हटली जाते. पण या स्वप्नांच्या नगरीत राहणाऱ्या लोकांचे स्पिरिट पण तेवढेच प्रसिद्ध आहे. मुंबईत लोकल असो की इतर कुठली जागा एकमेकांना सांभाळून घेतले जाते. मुंबई स्पिरिटचा याची देही याची डोळा अनुभव देणारी घटना आज घडली आहे.

मुंबईतील वाळकेश्वर भागात एक चारचाकी गाडी उलटली होती. ही गाडी परत जशीच्या तशी उभी करण्यासाठी एकेक करत लोकांचा जमाव तयार झाला आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये गाडी पूर्ववत करण्यात आली. 'लोग आते गये और कारवाँ बनता गया' या म्हणीप्रमाणे एकेकजण येऊन गाडीला हलवण्यासाठी हातभार लावू लागला.

ट्विटरवर हा व्हिडीओ एका युजरने पोस्ट केला आणि बघता बघता तो व्हायरल झाला. नेहमीच हातातले कामे बाजूला ठेऊन एकमेकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या मुंबईकरांच्या स्वभावाचे कौतुक होऊ लागले. 

वेगवेगळ्या सोशल मिडिया पेजेसवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओजना लाखांच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ बघून मुंबईकरांच स्पिरीट तर दिसतंच पण एकत्र आल्यानंतर काय ताकद निर्माण होते याचाही अंदाज येतो. 

तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ? काय म्हणाल?

सबस्क्राईब करा

* indicates required