computer

लडाखला बनवलं आहे आईस कॅफे, बर्फ वितळल्यावर त्याचं काय करणार हे ही जाणून घ्या!!

मंडळी, आपण नेहमी ऐकत असतो की अमुक देशामध्ये बर्फाचं हॉटेल बनलं, तमुक एका देशामध्ये आईस कॅफे बनलंय. आज आम्ही भारतातली बातमी घेऊन आलो आहोत. लडाख येथे एक आईस कॅफे तयार झालं आहे. या आईस कॅफेची खासियत म्हणजे हे भारतातलं पाहिलं नैसर्गिक आईस कॅफे आहे.

चला तर या आईस कॅफेला भेट देऊया.

लडाखचं ‘गया’ हे गाव समुद्रसपाटीपासून तब्बल १४,००० फुटांवर आहे. या गावाजवळच्या मनाली-लेह महामार्गावर संपूर्णपणे बर्फाने बनलेलं कॅफे आहे. हे कॅफे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनच्या जवानांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने तयार केलं आहे.

हे कॅफे नैसर्गिक का आहे ? याचं कारण म्हणजे या कॅफेचा आकार हा निसर्गत: तयार झाला आहे. त्याला योग्य तो आकार देण्याचं काम आपल्या जवानांनी आणि गावकऱ्यांनी केलं आहे. या कॅफेचा सध्याचा आकार एखाद्या बौद्ध मठसारखा आहे. हा असा आकार देण्यामागे एक मोठा विचार आहे. जेव्हा बर्फ वितळेल तेव्हा याच पाण्याचा सिंचनासाठी वापर करण्यात येणार आहे.

तुम्ही जर या कॅफेला भेट दिली तर तुम्हाला पारंपारिक नुडल्स आणि इतर खाद्यपदार्थ मिळतील. शिवाय इथला निसर्ग म्हणजे नुसता लाजवाब आहे हे वेगळं सांगायला नको.

राव, आम्ही तुम्हाला लडाखला जायचं नवीन कारण दिलंय !! मग कधी निघताय ??

सबस्क्राईब करा

* indicates required