तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ घालवण्यासाठी मुंबईत बनतोय अजून एक मरीन ड्राईव्ह !!!

क्वीन्स नेकलेस म्हणून ओळखली जाणारी मरीन ड्राईव्ह म्हणजे मुंबईची शान. समोर पसरलेला अथांग समुद्र आणि मनसोक्त फिरण्याची जागा. कट्ट्यावर बसणं, सोबत एक भेळ, गार वारा यापेक्षा चांगली संध्याकाळ कुठे असणार ?   प्रत्येक मुंबईकर फिदाच असतो म्हणा ना मरीन ड्राईव्हवर!!

आता तुम्ही जर मरीन ड्राईव्ह प्रेमी असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे, आपल्या मुंबईत नवी मरीन ड्राईव्ह तयार होणार आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टनं मुंबईचा कायापालट करण्याचं ठरवलंय. त्यांच्या एका प्रकल्पाचा भाग म्हणून  पुढील काही वर्षात माझगाव ते वडाळा एक नवीन मरीन ड्राईव्ह तयार होणार आहे.  या नव्या मरीन ड्राईव्हची लांबी थोडीथोडकी नाही, तर चक्क  ७ किलोमीटर असणार आहे. म्हणजेच आत्ताच्या मरीन ड्राईव्हपेक्षा दुप्पट!!  मग,  आहे कि नाही मस्त खुशखबर ?

Image result for marine drive 2.0स्रोत

या प्रोजेक्टसाठी ३५० हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागेत ‘ओवल गार्डन’ पेक्षा पाचपट मोठं असं एक इकोलॉजिकल गार्डनही असणार आहे म्हणे. आणि  अशीही खबर आहे कि एलिफंटापासून हाजी बंदरपर्यंत रोपवे तयार होणार आहे.

एकंदरीत पुढच्या चार-पाच वर्षांत मुंबईचा कायापालट नक्की. मुंबईकरांची तर बल्ले बल्ले झाली ना राव.

सबस्क्राईब करा

* indicates required