१० दिवसात दाम दुप्पट...डी-मार्टच्या शेअर्सचे दमदार पदार्पण !!!

काही दिवसांपूर्वी आम्ही डी मार्टच्या शेअर बद्दल एक लेख प्रकाशित केला होता . आज ज्या वाचकांनी त्या शेअर्स साठी अर्ज केला होता आणि ज्यांना शेअर मिळाले त्या वाचकांनी आज आम्हाला म्हणजे टीम बोभाटाला एक झकास पार्टी द्यावी अशी माफक अपेक्षा आहे कारण.....

करणार का अर्ज डी-मार्टच्या शेअर्ससाठी ?

आज सकाळी डी मार्टच्या शेअरचे बाजारात दणक्यात पदार्पण झाले आणि शेअरला चक्क ६०१ रुपयाचा भाव मिळाला. म्हणजे पंधरा दिवसात पैसे दामदुप्पट झाले. जास्तीत जास्त ६१५ रुपयाची पातळी गाठून आता हा भाव ५५८ रुपयांवर स्थिरावला आहे. 

बाजारात ५५ % गुंतवणूकदार म्हणातायत शेअर या भावात विकून टाका आणि ३८ टक्के गुंतवणूकदार म्हणतात विकून टाका ?

तुम्ही काय करणार ? आम्ही  ओमर खय्यामच्या चार ओळीत सांगतो आहे. 

Ah, take the Cash, and let the Credit go,
Nor heed the rumble of a distant Drum !

बाकी तुमचं तुम्ही बघा !!

सबस्क्राईब करा

* indicates required