सुनील ग्रोवर पाठोपाठ अजून एक कलाकार शो सोडून जात आहे....इथे क्लिक करा आणि जाणून घ्या !!!

एकीकडे कपिलच्या गर्लफ्रेंडचा पहिला फोटो बघण्याचा आनंद आणि दुसरीकडे सुनील ग्रोवरचं शो सोडून जाणं. दोन्ही लागोपाठ म्हणजे ‘कपिल शर्मा शो’ च्या चाहत्यांना हसावं कि रडावं तेच कळेनासं झालं होत आता हे संपतं कुठं तोच अजून एक दुखद वार्ता येत आहे ती अशी कि चंदू चायवाला हे पात्र सकाणारा ‘चंदन प्रभाकर’ हा देखील शो सोडून जाणार आहे.

Image result for chandan prabhakarस्रोत

ऑस्ट्रेलिया ते मुंबई प्रवासादरम्यान कपिलने सुनील ग्रोवरला मारहाण करत अपमानास्पद भाषा वापरली होती. या घटनेनंतर सुनील ग्रोवर एकटाच शो सोडणार असं म्हटलं जात होतं पण कपिलनं त्यावेळी चंदन प्रभाकर यालाही अपशब्द बोलले होते.

बोभाटाच्या खबरी नुसार सिद्धू यांच्या समजावण्यावरून सुद्धा दोघे आपला निर्णय बदलायला तयार नाहीत. या वादावर पडदा टाकण्यासाठी कपिलने सारवासारव केली खरी पण आता दोन मुख्य कलाकर शो सोडून गेल्यावर कपिल एकटाच किती बँटींग करतो ते पाहण्यासारखं असेल.

सबस्क्राईब करा

* indicates required