हे बरं झालं... व्हाट्सअॅपचं टेक्स्ट स्टेटस परत आलं!

व्हाट्सअॅपने महिनाभरापूर्वीच युजर्ससाठी जुनं टेक्स्ट स्टेटस फिचर काढून टाकून एक नवं फिचर आणलं होतं. ज्यामुळे आपणाला फोटो, व्हीडीओ किंवा GIF इमेजेस स्टेटस म्हणून ठेवता येतात. पण हे स्टेटस दर २४ तासांनी नव्याने अपडेट करावे लागते. हे फिचर म्हणजे स्नॅपचॅट स्टोरीची हुबेहूब नक्कल असल्यामुळों वापरकर्त्यांना यात नवीन असं काहीच मिळालं नाही. त्यात सजवलेले भारी भारी टेक्स्ट स्टेटसही लिहिता येत नसल्यानं भारतातील तमाम स्टेटस किंग्जना व्हाट्सअॅपवर आपलं इम्प्रेशन पण पाडता येईना...  (येतंय व्हाट्सअॅपचं नादखुळं फीचर : चला पोस्ट करा तुमचं स्टेटस...

स्त्रोत

एकंदरीत या नव्या फिचरवर युजर्सकडून बऱ्याच नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे व्हाट्सअॅपने लोकांची मागणी पाहून आपलं जुनं टेक्स्ट फिचर परत आणलंय. तेव्हा आता पूर्वीसारखंच तुम्ही शब्दरूपात आपलं स्टेटस प्रोफाईलवर सेट करू शकता. यावेळी तुमचं स्टेटस हे तुमच्या प्रोफाईलोमधल्या अबाऊट सेक्शनमध्ये आणि ग्रुपमधील तुमच्या नंबरच्या पुढे दिसेल. तेही फक्त तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणार्‍या लोकांना्च. पण हे फिचर मिळवण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन व्हाट्सअॅप अपग्रेड करावं लागेल. 

मात्र यासोबत व्हाट्सअॅपने आपलं ते नवीन फोटो, व्हीडीओ स्टेटसचं फिचरही कायम ठेवलं आहे. तेव्हा लवकर व्हाट्सअॅप अपग्रेड करा आणि परत स्टेटस ठेवून टाका... Available, Busy, Sleeping वगैरे वैगेरे.. 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required